पंढरपूर, दि.19:- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही शासनाची मोहीम संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहीमेतंर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीसाठी घरी येणाऱ्या आरोग्य पथकास संपूर्ण माहिती द्यावी नागरिकांनी आजाराची कोणतीही माहिती लपवू नये असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
मौजे चिखली, ता.मोहोळ येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेतंर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार यशवंत माने, सरपंच इंदूबाई वाघमोडे, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भिमाशंकर जमादार, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, नायब तहसिलदार राजशेखर लिंबारे, तालुका आरोग्य अधिकारी अरुण पाथरुटकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही शासनाची मोहीमेत सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा. आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तर आपण नक्कीच आपले गाव, शहर तसेच जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी हातभार लागेल असे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेतंर्गत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी दिली
पालकमंत्री भरणे यांनी मते कुटुंबियांची घेतली भेट
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेतंर्गत मौजे चिखली तालुका मोहोळ येथे मते कुटंबियांच्या घरी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आरोग्य पथकासह भेट दिली. आरोग्य पथकाकडून मते कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री भरणे यांनी कोरोना पासून स्वत: ला आपल्या कुटुंबाला सुरक्षित कसे ठेवायचे. घरात कोणती काळजी घ्यावी. याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार यशवंत माने, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भिमाशंकर जमादार उपस्थित होते.
पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी



