आज दि. 20 सप्टेंबर रोजी पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयात नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनाच्या संकटकाळात आपापल्या परीने समाजसेवेचं अनमोल कार्य केलेल्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
वारकरी सांप्रदाय पाईक संघटनेने सबंध वारकरी भाविकांच्या हितासाठी गेल्या अनेक वर्षापासुन उल्लेखनीय कार्य केलेले आहे. तसेच मागील वर्षी सांगली-कोल्हापूर भागातील पुरग्रस्तांसाठी भरीव मदत केली. अशा वारकरी सांप्रदाय पाईक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ह.भ.प. विठ्ठल महाराज चवरे व राष्ट्रीय उपाध्यक्षपदी ह.भ.प. विठ्ठल महाराज पैठणकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पुष्पहार व श्रीफळ देऊन संपादक भगवान वानखेडे यांनी सत्कार केला.
पंढरपूर नगरपरिषदेचे आरोग्य समिती सभापती नगरसेवक विवेक परदेशी यांनी कोरोनाच्या संकटकाळात अतिशय सक्रीय राहुन भरीव कार्य केले आहे. कोरोनासंबंधी जनजागृती करण्यासोबतच वाखरी येथील कोविड सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांच्या उपचारासंबंधी आवश्यक ती खबरदारी घेणे, तसेच कोविड सेंटरला पंप व पीपीई कीट देणे, नगरपरिषदेला इलेक्ट्रॉनिक हँड पंप देणे असे उल्लेखणीय कार्य केले आहे. आज त्यांचा वाढदिवसही होता. यासर्वांचे औचित्य साधुन आज पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयात त्यांचा पुष्पहार व श्रीफळ देऊन संपादक भगवान वानखेडे यांनी सत्कार केला.
पंढरीतील समाजसेवक ओंकार बसवंती यांनी कोरोनाच्या संकटकाळात वाखरी येथील कोविड सेंटरसाठी सॅनिटायझरचे वाटप, क्वारंटाईन सेंटरमधील परप्रांतीय कामगारांसाठी अन्नधान्याचा पुरवठा केला, बेघर लोकांसाठी जेवणाचे वाटप, भाजीपाला वाटप असे भरीव कार्य केलेले आहे. नुकतीच त्यांची लिंगायत प्रतिष्ठान सोलापूर जिल्हाध्यक्ष निवड करण्यात आली आहे. याचे औचित्य साधुन आज पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयात त्यांचा पुष्पहार व श्रीफळ देऊन संपादक भगवान वानखेडे यांनी सत्कार केला.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी






