👁 15 Views

कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; साहसी नृत्ये आणि ‘हर घर तिरंगा’ रॅलीने वेधले लक्ष

कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; साहसी नृत्ये आणि ‘हर घर तिरंगा’ रॅलीने वेधले लक्ष

पंढरपूर:
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला पंढरपूर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ऋजुता उत्पात व नारायण उत्पात उपस्थित होते.ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम उपस्थितांची दाद मिळवून गेले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी
​सांस्कृतिक व साहसी सादरीकरण केले. तसेच विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांवर प्रभावी नृत्ये सादर केली. तसेच, शारीरिक कौशल्ये आणि चपळाईचे दर्शन घडवणारे साहसी क्रीडा प्रकारांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
​’हर घर तिरंगा’ रॅली: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रशालेतर्फे भव्य ‘हर घर तिरंगा’ रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.


​यावेळी प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई, संस्थेचे रजिस्ट्रार गणेश वाळके, तुकाराम राऊत आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *