श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी पंढरपूर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताचा ८० व्या स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी चे ओएसडी (सोलापूर विभाग) प्रा. संजय वायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात एक राष्ट्र या संकल्पनेशी एकरूप राहण्याची प्रेरणा देणारा आज चा दिवस असून तरुण अभियंत्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करून भारताला आत्मनिर्भर बनवावे असे सांगून त्यांनी उपस्थितांमध्ये राष्ट्र प्रेमाची भावना जागृत केली. भारताला शक्तिशाली बनविण्याचे सामर्थ्य हे तरुणांमध्ये असून प्रत्येकानी एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे असे सांगून त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार गणेश वाळके, तसेच कर्मयोगी शिक्षण संकुलातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Posted inEducation Pandharpur Live News
कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा.

