👁 10 Views

कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनीचे राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश

कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनीचे राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर प्रशालेची विद्यार्थिनी कु. मेघा मिथुन शिंदे हिने राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता पहिली व दुसरी या गटात तिने प्रथम क्रमांक पटकावत आपल्या बुद्धिमत्तेची व गणितीय कौशल्याची चमक दाखवून दिली.

मेघाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे विश्वस्त रोहन परिचारक , प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई, रजिस्ट्रार गणेश वाळके तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *