Pandharpur : पंढरपूरमध्ये शेलार कॉम्प्लेक्स व हॉटेल स्प्री चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न, बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व ग्रामविकास मंत्री व सोलापूर चे पालक मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती

Pandharpur : पंढरपूरमध्ये शेलार कॉम्प्लेक्स व हॉटेल स्प्री चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न, बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व ग्रामविकास मंत्री व सोलापूर चे पालक मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती

Loading

पंढरपूर (प्रतिनिधी) : काल शनिवार, दि.५ एप्रिल २०२५ रोजी सायं. ५ वा. पंढरपूर येथील सह्याद्री नगर इसबावी येथे उभारण्यात आलेल्या शेलार कॉम्प्लेक्स व हॉटेल स्प्री चा भव्य उद्घाटन सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर चे पालक मंत्री जयकुमार गोरे हे होते.

मुळचे साताऱ्या चे सुपूत्र असलेले उद्योजक विजय श्रीरंग शेलार यांनी पंढरपुरात ही देखणी इमारत उभारलीय. कार्यक्रमाचं प्रास्ताविक सातारा चे माजी जि.प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुंबरे यांनी केलं तर आभार कृषी उत्पन्न बाजार समिती महाबळेश्वर जावळी चे सभापती जयदीप शिंदे यांनी मानले, सुत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. या सोहळ्यात सातारा येथील विरेंद्र केंजळे प्रस्तुत साज ग्रुप च्या गायक वादक कलाकारांनी बहारदार गीतांनी समारंभाची रंगत वाढवली.

या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्याचे पर्यटन विकास मंत्री मकरंद (आबा) पाटील, माजी सहकार मंत्री आमदार सुभाष (बापू) देशमुख, आमदार समाधान (दादा) आवताडे, आमदार अभिजीत आबा पाटील, माजी आमदार दत्तात्रय सावंत, खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक, आमदार सचिन कल्याण शेट्टी, सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील, रयत आथनी सह. साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह उंडाळकर-पाटील , स्वेरी इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य बी.पी. रोंगे सर, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे, सातारा जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई, संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, प्रदीप विधाते, दत्तानाना ढमाळ, ज्ञानदेव रांजणे, व्यवस्थापक राजेंद्र सरकाळे, दैनिक पुढारी सातारा चे संपादक हरीष पाटणे, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक हिंदूराव तरडे, जावळी जिल्हा बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे, व्हाईस चेअरमन चंद्रकांत दळवी, संचालक योगेश गोळे व सर्व संचालक, ऍडव्होकेट शिवाजीराव मर्ढेकर, लालासाहेब वंजारी सर, पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, पांडुरंग साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन वसंतनाना देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, माजी जि.प. सदस्य सी.पी. बागल, पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, पंढरपुर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष विशाल मलपे, माजी नगरसेवक गणेश अधटराव, बालाजी मलपे, विक्रम शिरसट, सचिन शिंदे, मुन्ना मलपे, स्वेरी इंजिनिअरींग कॉलेजचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, माजी अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, नामदेव कागदे, अशोक भोसले, नाडगौडा सर, हनीफ शेख, अशोक भोसले, सुरेश राऊत, मराठा महासंघाचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण, यांचेसह पंढरीतील अनेक माजी नगरसेवक, समाजसेवक, सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर चे पालक मंत्री जयकुमार गोरे, बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यटन विकास मंत्री मकरंद (आबा) पाटील, माजी सहकार मंत्री आमदार सुभाष (बापू) देशमुख, आमदार अभिजीत आबा पाटील, माजी आमदार दत्तात्रय सावंत
यांनी उद्योजक विजय श्रीरंग शेलार यांच्या कार्याचं कौतुक करत शेलार परिवाराच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, विजय शेलार यांनी अतिशय शुन्यातून विश्व निर्माण करून यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावलंय, आज इथे उभारलेल्या शेलार कॉम्प्लेक्स च्या माध्यमातून त्यांनी भुवैकुंठ पंढरीच्या वैभवात भर घातलीय. ही बाब आम्हा सातारकरांसाठी निश्चितच कौतुकास्पद आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *