माढ्याच्या मातीतुन पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पै.शेळके यांनी मिळविला – आ. अभिजीत पाटील ; शेळके कुटुंबाच्या पाठीशी कायम उभे राहणार आमदार पाटील यांची घोषणा

माढ्याच्या मातीतुन पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पै.शेळके यांनी मिळविला – आ. अभिजीत पाटील ; शेळके कुटुंबाच्या पाठीशी कायम उभे राहणार आमदार पाटील यांची घोषणा

Loading

प्रतिनिधी/-

कुस्ती क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ६६ वा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान बेंबळे येथील पै. वेताळ शेळके यांनी मिळविला असून माढ्याच्या मातीतुन पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान शेळके यांनी मिळविला असल्याचे प्रतिपादन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी केले.

माढा तालुक्यास प्रथमच महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान शेळके यांनी मिळवुन दिला असून या निमित्ताने मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांचे हस्ते पैलवान शेळके यांचे मूळ गावी बेंबळे या ठिकाणी जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार पाटील बोलत होते. यावेळी बेंबळे वासियांच्या वतीने पैलवान शेळके यांची गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. संघर्षातून वाट काढून आई वडीलाचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या बेंबळे येथील महाराष्ट्र केसरी पै.वेताळदादा शेळके व त्यांच्या आई-वडीलांचा नागरी सत्कार आ. अभिजीत पाटील यांच्या वतीने करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना आ. पाटील म्हणाले, पै.वेताळ यांचे आई वडील लोकांच्या शेतात जाऊन काबाडकष्ट करून घर चालवत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील पोरगं जेव्हा ‘महाराष्ट्र केसरी’ होतो, तेव्हा आई-वडलांचा आनंद गगनात मावत नाही. मागील काही महिन्यामध्ये आपण टेंभुर्णीत ‘माढा केसरी’ कुस्ती मैदानात जाहीर बोललो होतो की; याच तांबड्या मातीतून उद्याचा महाराष्ट्र केसरी उदयास येईल तो नक्कीच पै. वेताळ शेळके यांच्या नावाने मिळाला आहे. या मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेच्या आशिर्वादाने मी आमदार झालो; म्हणून विधानसभेत तुमचे प्रश्न मांडू शकलो; तसेच आपण सर्वजण पैलवान वेताळ व कुटुंबीयांच्या खंबीरपणं पाठीशी उभं राहू. अजून पुढच्या काळात हिंद केसरी पर्यत मजल मारून माढ्याच्या मातीतला हिरा जगाबाहेर गाजवू असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी मल्ल सम्राट श्री.रावसाहेब मगर, सर्वच सामाजिक, राजकीय, वस्ताद, पैलवान मंडळीसह पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
सामान्य कुटुंबातील पै.वेताळ शेळके यांचे आई- वडिलांनी बिकट परिस्थितीशी सामना करून आपल्या मुलास घडविले आहे. पै.शेळके यांनी मिळवलेले यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असुन त्यांच्या सोबत कायम पाठीशी आहे.- आ.अभिजीत पाटील

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *