![]()
पंढरपूर प्रतिनिधी –
पंढरपूरच्या नगराध्यक्षपदी डॉ. प्रणिता भालके या विक्रमी मतांनी विजयी झाल्या असून त्यांना एकुण ३४९६० मते मिळाली असुन १११३६ मतांचे मताधिक्य त्यांना मिळाले आहे. याचे श्रेय पंढरपूरच्या स्वाभिमानी जनतेला देत असल्याचे माध्यम प्रतिनिधी यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले.

तर भारतीय जनता पार्टीचे २० नगरसेवक विजय झाले असून तिर्थक्षेत्र विकास आघाडी ११, पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी ४,अपक्ष १ असा निवडणूक निकाल जाहीर झाला आहे.

पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या मतमोजणी पंढरपूर शासकीय गोदाम येथे पोलिस प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तात पार पडली पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी
कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वसामान्य नागरिक तसेच मतदारांना लागली होती.

पंढरपुर नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी निवडणूक रिंगणात विविध राजकीय पक्षांचे व विविध आघाड्यांचे उमेदवार रिंगणात उतरले होते भाजपा व तिर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्यातच काटे की टक्कर पहावयास मिळाली.यामुळे पंढरपूरची निवडणूक चुरशीची झाल्याचे दिसून आली होती तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती तर विरोधकांच्या उमेदवारांची अस्तित्वाची लढाई असलेल्या चित्र दिसून येत होते.

पंढरपुर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत १८ प्रभागात १३३ नगरसेवक,उमेदवार तर नगराध्यक्षा पदासाठी ५ उमेदवार निवडून रिंगणात उतरले होते. प्रभाव ५ अ मधुन भाजपाच्या उमेदवार कुसुम परचंडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर प्रभाग ५ ब मधुन अपक्ष उमेदवार अटीतटीच्या लढतीत ओंकार अभय जोशी हे विजयी झाले आहेत.

पंढरपूर नगरपरिषद विजयी उमेदवार पुढील प्रमाणे –
भालके प्रणिता भगिरथ नगराध्यक्ष


निवडून आलेले नुतन नगरसेवक :
चौगुले लखन जंबू १-अ
शिंदे अर्चना गणेश १-ब
कळसे प्रसाद प्रकाश २-अ
घाडगे प्रणिता किरण २- ब
पानकर तेजश्री रोहित ३-अ
गंगेकर अक्षय प्रताप ३-ब
संगितराव विनायक कुमार ४-अ
तारापुरकर प्रियांका सागर ४-ब
परचंडे कुसुम जगन्नाथ ५-अ
जोशी ओंकार अभय ५-ब

सर्वगोड सुजितकुमार एकनाथ
६-अ
बोहरी रेहाना इब्राहिम ६-ब
माने शिला शरद ७-अ
बडवे वासुदेव त्रिंबक ७-ब
देशपांडे मनिषा धनंजय ८-अ
पवार प्रदीप दिलीप ८-ब
शिरसट प्रतिक्षा विक्रम ९-अ
अधटराव संदिप पांडुरंग ९-ब
धोत्रे साधना सुधीर १०-अ
बंदपट्टे संजय जवाहरलाल १०-ब
ढवळे अनिता सिकंदर ११-अ
मलपे बालाजी अरूण ११-ब
परचंडे निता नितीन १२-अ
मलपे विशाल दगड्डु १२-ब
धोत्रे रुक्मिणी धनाजी १३-अ
भोसले नागेश आण्णासाहेब १३-ब
भालेराव उज्वला महादेव १४-अ
धोत्रे महादेव माणिक १४-ब
घोडके धर्मराज आण्णाप्पा १५-अ
फत्तेपुरकर स्मिता आदित्य
१५-ब
डोके अमोल विठ्ठल १६-अ
शेंबडे संध्या मालोजी १६-ब
यादव लोकेश नागनाथ १७-अ
धोत्रे माधुरी दिलीप १७-ब
देवमारे विनायक बसवेश्वर १८-अ
शिंदे ज्योती अशोक १८-ब


