Pandharpur Live News : कर्मयोगी विद्यानिकेतन च्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

Pandharpur Live News : कर्मयोगी विद्यानिकेतन च्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

Loading

पंढरपूर (प्रतिनिधी) : येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांना इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड यांच्या मार्फत देण्यात येणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

प्रा. प्रियदर्शिनी सरदेसाई यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी घेतलेले अथक कष्ट-परिश्रम तसेच मेहनत, शाळेच्या गुणवत्ता तसेच शिस्त यांच्यात केलेल्या सुधारणे बरोबरच विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

शैक्षणिक क्षेत्रात २५ वर्ष कार्यरत असलेल्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांचे नेतृत्व,शिस्त,विद्यार्थ्यांच्या सोबतचे संवाद कौशल्य आणि विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांचे भविष्य निर्धारणासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे.

प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे प्राचार्या पदी नेमणूक झाल्यानंतर प्रशालेमध्ये अनेक शैक्षणिक बदल करून विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या. ज्यात अनेक विद्यार्थी ओलंपियाड, शिष्यवृत्ती परीक्षा त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तीर्ण झाले.

तसेच विद्यार्थ्यांसाठी अनेक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देऊन त्यांना समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून घडवत आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अनेक क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत असून शाळेची गुणवत्ता उंचावताना दिसत आहेत.

“शिक्षक समाजाला दिशादर्शक असतात, प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्यासारखे शिक्षक हे समाजामध्ये एक आदर्श निर्माण करत असतात.”असे प्रतिपादन संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री. रोहन परिचारक यांनी केले.

या पुरस्कारासाठी संस्थेचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके, व प्रशालेतील सर्व शिक्षक यांनी प्राचार्यांचे अभिनंदन केले

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *