फेब्रुवारी महिना संपला आणि हळूहळू वातावरणाच्या बदलाचे वारे वेगाने वाहु लागलेत गारवा संपुण उष्णतेने आपला तप्त स्वरूप दाखवायला सुरुवात केलेली आहे.फाल्गुन चैत्र शुद्ध म्हणजे च मार्च महिन्यात आपल्या सर्वांना वेध लागतात ते म्हणजे शिमगा सणाचे ‘शिमगा’ म्हणजे च होळी खासकरून कोकण वासीयांचा महत्वाचा व आवडता सण म्हणुन होळी या सणाला भक्तिमय व श्रद्धेने पाहिले जाते.
प्रामुख्याने कोकणातील ग्रामवासीय आपल्या नोकरी, व्यवसाय, निमित्ताने मुंबई सारख्या शहरात वास्तव्यास असल्याने त्यांना या सणाचा उत्साह हा अंतर्मनात संचारलेला असतो.ग्रामदेवतेचा आशिर्वाद सदा त्यांच्या पाठीशी असतो . त्यामुळे कसलीही तमा न बाळगता आगावु सुट्टी ची व्यवस्था करून, मिळेल तशा वाहनांची व्यवस्था पाहुन, कोकणातील ग्रामस्थ बांधव हे गावी या होळी शिमगा या सणासाठी पोहोचतात,
तसे पाहता कोकण छोट्या व मोठ्या वाड्या ,वस्त्या,व तेथील भौगोलिक परिस्थिती,व जण संख्येवर आधारित गावा गावात विभागला गेलाय त्याच प्रमाणे येथील प्रत्येक गावात तेथील सर्वांची रक्षणकर्ती ग्रामदैवता व गावातील परंपरा चालीरीती ,रूढी, सांस्कृतिक ठेवा, एकात्मता यांची सुरेल गुंफण येथील कोकणवासीयांनी ग्रामवासीयांनी अविरतपणे जपली आहे.आणि येणारी पुढील पिढी ही त्यांची परंपरा जोपासेल यात शंका नाही.
चला…..तर मग ! आज आपण जाणून घेऊया दापोली तालुक्यातील मौ. आमखोल गावच्या शिमगा या सणाबरोबरच येथील जागृत ग्रामदेवता आई श्री काळेश्वरी माते विषयी व सणाच्या वैविध्यपूर्ण परंपरे विषयी अल्पशी शब्द सुमणांची मुक्त उधळण…..!
मुंबई सारख्या शहरात आपण पाहतो’ होळी ‘ व रंगपंचमी असे दोनच दिवस हा सण साजरा केला जातो. मात्र ग्रामीण भागात दहा दिवस होळीकोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.या दहाही दिवशी होळी दहन करण्यात येते.दहाव्या दिवशी मात्र मोठी होळी उभारली जाते.उर्वरीत नऊही दिवस सुका पेंढा (गवत) अबाल वृद्ध एकत्रित जमुन गोळा करतात, होळीच्या मध्यभागी वृक्षाचे भले मोठे फांदी ऊभी करून त्याभोवती सुक्या गवताचे आवरण देवून होळी उभी केली जाते.असे प्रामुख्याने नऊ दिवस होळी उभारण्याची प्रथा आहे.
याच दरम्यान अनुक्रमे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आमखोल गावाची ग्रामदेवता श्री काळेश्वरी,शेंदकरीण,मावळे भाचे,या जागृत दैवतांची पालखी मिरवणूक गावच्या बाहेरील आजुबाजुच्या गावांमध्ये दर्शन करण्याकरिता,नवस करणे,फेडणे, शेराण म्हणजे च देवतेची खुणगाठ ओळखून देवी स्वत काढते.अशा परंपरा युक्त. भक्तीने भारलेल्या भक्तांच्या उपस्थितीत ग्रामदेवतेची पालखी सन ई ढोल, टिमकी,ताशा, घंटानाद,अशा पारंपरिक वाद्यांच्या तालावर वाजत गाजत निघते.
यावर्षी पालखी मिरवणूक पुढील प्रमाणे निघण्याचे नियोजन आहे. ६ मार्च रोजी संध्याकाळी ५. वाजता वांझळोली या गावात जायला मार्गस्थ होणार आहे.व वाघीवणे या ठिकाणी ती विश्रांती करीता थांबणार आहे.व ७ मार्च २०२५ रोजी इलणे,लोणवडी ही गावे भेट देवून आडे या ठिकाणी विश्रांती करीता थांबणार आहे.तसेच ८मार्च रोजी हर्णै गावभेट घेवुन, केळशी या ठिकाणी विश्रांती करीता थांबणार आहे.व ९मार्च रोजी केळशी गावभेट घेवुन झाल्यावर रोवतोली गावामध्ये विश्रांती करीता थांबणार आहे.१०मार्च कवडोली,बाईतवाडी, सावंतवाडी,अनंतवाडी, बाजारपेठ, ही गावे भक्त भेटी झाल्यावर पुन्हा ग्रामदेवतेची पालखी हि आमखोल या गावात येण्यासाठी मार्ग स्थ होईल असा ग्रामदेवतेचा पालखी मिरवणूकीची आखणी ग्रामस्थ भक्तांनी केली आहे.
प्रत्येक गावाने आपापल्या परीने आपला वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न केला आहे.त्याचाच भाग म्हणजे काही ठिकाणी ग्रामदेवतेच्या अनुमतीने पालखी मिरवणूक, तर काही ठिकाणी गोमुचा नाच, संकासुर,अशा प्रकारातुन आपली परंपरा चालीरीती जोपासल्या आहेत हे एक ग्रामीण संस्कृतीचे वैशिष्ट्य
‘ खेळी’ म्हणजे काय ? खेळी म्हणजे भक्तीने भारावलेला, जो तहान भूक विसरून ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर अनवाणी पायी चालत खाच खळगे, झाडांच्या फांद्या ना असणारे तिक्ष्ण काटे,या कशाचीही पर्वा न करता ग्रामदेवतेच्या पालखी सोबत मार्ग स्थ होणारा भक्त म्हणजेच ‘खेळी’ होय, यावर्षी खेळ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी काही नव तरूणांनी आमखोल गावातील खेळण्यासाठी डोक्यावरती आमखोल शिमगा महोत्सव असा उल्लेख असणारी टोपी व आकर्षक झबा ग्रामदेवतेचा फोटो छपाई असलेला पेहराव सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे.
देवीच्या पालखी मिरवणुकीत मनसणारे’ पाटील ‘ यांची अहम भुमिका असते. पाटील म्हणजे भक्तांचे गार्हाणे त्याची व्यथा ग्रामदेवतेला सांगुन त्या भक्ताला सुख समाधानाचे वचन देवतेकडुन मनसुण घेण्याची सांगण्याची महत्त्वाची भूमिका पाटील बजावत असतात. तो मान दरवर्षी गावातील श्री पांडुरंग गावणुक, श्री बबन गावणुक, श्री रघुनाथ मांडवकर, हे सांभाळतात व खेळ्यांच्या उत्साहात भर घालतात.
यावर्षी मात्र गावातील नवतरूणांनी ज्या लोप पावत चाललेल्या जुन्या पारंपरिक साहसी प्रकारांपैकी एक मानला जात असलेला काठीचा खेळ अर्थात बानाट्या खेळणे असे म्हटले जाते या खेळाला पुन्हा सर्वान समोर आणण्याचा त्यांचा मानस आहे गावातील नवतरुणांचे युवा मंच पारंपरिक पोशाखात पालखी नाचवणे, तसेच उत्कृष्ट नृत्य सादर करणार्यास सन्मानित करण्यात येणार आहे व लोप पावत चाललेल्या रूढी , संस्कृती नवं पिढीला उमजून ती अखंडित पुढे चालू रहावी हा यामागचा उद्देश आहे.
अशा तर्हेने दहा दिवस चालणारी होळी मोठा होम पेटवल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड अर्थात रंगपंचमी खेळुन आनंदोत्सव साजरा करत मोठी होळी पेटवण्याच्या दोन दिवस अगोदर ग्रामदेवतेच्या पालखीला गावांतील प्रत्येक घरात श्रद्धेने आणुन यथा सांग पुजा अर्चा करण्यात येते.प्रसाद नैवेद्य अर्पण केला जातो.खेळ्यांना भंडारा प्रसाद दिला जातो.आणि सर्वांना सुख समृद्धी चे गार्हाणे ग्रामदेवतेला सांगुन मंदिरात पालखी श्रद्धेने नेवून ग्रामदेवतेला स्थानापन्न होण्याची विनंती केली जाते.
आजच्या धावपळीच्या युगात आजही आपला कोकणातील महत्त्वाचा सण मानला जाणारा होळी एकतेचा ,बंधुतेचा , अखंडित राहण्याचा संदेश आपल्या ला निश्चितच देतो.रंगाप्रमाणे आपले आयुष्य रंग रंगीत छटा जश्या अवकाशात दिसतात इंद्र धनुच्या , त्याचप्रमाणे एकमेकांना रंग रंगात रंगवून रंगपंचमी खेळताना मानसिक आनंद हास्याच्या फवार्याने जिवन ही आनंदमय रंगीन होवून जातो.
बंधुंनो आमखोल गावचा शिमगा व ग्रामदेवतेची पालखी मिरवणूक अविस्मरणीय असा नेत्रदीपक सोहळा सर्व ग्रामस्थ भक्त खेळी यांच्या भक्तिमय मनाला वाटणारी ग्रामदेवतेच्या प्रती ओढ,तिच्या श्रद्धेची जोड,तिथे श्रद्धेने भक्त मातेचरणी नतमस्तक होऊन जातो.व लेखणीतून उत्फृर्त काव्य सुमणे शब्दात वाणीत उमटतात…..
हिरवळ रानात वनात
डोंगर कुशीत गाव
आमखोल तयाचे नाव
जनात माणुसकीचा भाव….
रक्षणकर्ती अमुची माऊली
हाकेला सदैव धावली
भक्ती दाटे अंतरात
कृपेची देई ती सावली....
श्री सनी गणेश आडेकर, मुंबई