सोलापूर: अकलूजमध्ये भाजपची शाखा सुरू केल्याबद्दल मारहाण…..

सोलापूर: अकलूजमध्ये भाजपची शाखा सुरू केल्याबद्दल मारहाण…..

Loading

सोलापूर: अकलूजमध्ये भाजपची शाखा स्थापन केल्याच्या कारणावरून एकाला रस्त्यावर अडवून मारहाण केली आणि तलवारीने धमकावण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

चेतन अनिल पवार (वय ३२, रा. अकलूज) असे या मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून अकलूजमध्ये मोहिते-पाटील विरुद्ध माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि माजी आमदार राम सातपुते यांच्या गटात संघर्ष वाढला आहे.

चेतन पवार हे सकाळी परगावी निघालेल्या आपल्या आईला अकलूजमध्ये बसस्थानकाजवळ सोडून घरी परत येत होते. तेव्हा वाटेत बाजारतळावर सातजणांनी त्यांना अडविले. गावात भाजपची शाखा का स्थापन केली ? सयाजीराव मोहिते-पाटील यांची शाखा का सुरू केली नाही, असा जाब विचारत एकाने हाताने पाठीवर मारहाण केली. दुसऱ्याने तलवार काढून धमकावत, भाजप शाखेतून नाव काढून घे म्हणून दबाव आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संशयित आरोपींपैकी एकाची ओळख पटली असून, इतर सहाजण अनोळखी आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *