नांदेड : तालुक्यातील सावळी येथील तरुण शेतकऱ्याचा तंबाखूच्या भट्टीत पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २७) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. राहुल सुरेश देवकरे (वय २७) असे मृताचे नाव आहे.
त्याने रमाबाई देवकरे यांची शेती एक वर्षासाठी घेत तंबाखूची लागवड केली आहे. तो तंबाखूला धूर देत असताना तोल जाऊन तो धूर देणाऱ्या भट्टीत पडला आणि वाफेमुळे गुदमरून मृत पावला.
त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा- मुलगी असा परिवार आहे. राहुलचे वडील सुरेश यांना चार मुले होती. त्यापैकी दोन मुलांचा यापूर्वीच अपघाती मृत्यू झाला आहे. आता तिसऱ्या मुलाचाही दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.