हृदयविकाराच्या झटक्याने १४ वर्षांच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याने १४ वर्षांच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

Loading

नवी मुंबई महानगर पालिकेच्या घणसोली येथील इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. आयुष धर्मेंद्र सिंग असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

खालापूर जवळील इमॅजिका थिम पार्क येथे ही दुर्घटना घडली.

इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांची शालेय सहल खालापूर येथील इमॅजिका थिम पार्क येथे आली होती. सहली दरम्यान आयुष याला अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळ तो थिम पार्क येथील बाकड्यावर बसला होता. तिथेच अचानक तो जमिनीवर कोसलळला. थिम पार्क मधील कर्मचारी आणि शाळेतील शिक्षकांनी त्याला तात्काळ प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले. तिथून त्याला खोपोली येथील पार्वती रुग्णालयात आणले गेले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदनानंतर त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक अलोक खिसमतराव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *