राजगुरूनगर परिसरात एकाच दिवशी चार मृतदेह आढळुन आल्याने खळबळ…….

राजगुरूनगर परिसरात एकाच दिवशी चार मृतदेह आढळुन आल्याने खळबळ…….

Loading

चाकण ; खेड तालुक्यातील राजगुरुनगर परिसरात शनिवारी (दि.२२) एकाच दिवशी तीन जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तर एकाचा मृत्यू संशयास्पदरित्या आढळून आला आहे. एकाच दिवशी राजगुरूनगर परिसरात एकूण चार मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

यातील पहिल्या घटनेत राजगुरूनगर शहराच्या लगत चांडोली येथील लालबाबू रजिदर ठाकूर (वय ४५ रा.चांडोली) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसऱ्या घटनेत दोंदे (ता. खेड) गावातील काळुराम गुलाब भालशिंगे (वय ४५) यांनी त्यांच्या घरा जवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिसऱ्या घटनेत बुट्टेवाडी (ता. खेड) येथील रंजना गणपती जाधव (वय ४५, मूळ रा. चास, नारोडी) या शेतात मोलमजुरी करतात. त्यांचा मृतदेह पाडळी येथे राहणाऱ्या योगेश बालघरे यांच्या शेतात आढळून आला. त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.

चौथ्या घटनेत चांडोली (ता. खेड) येथील लालबहादूर राधे गौतम (वय ४५) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. एकाच दिवशी चार जणांचे मृतदेह मिळून आल्याने चर्चेला उधाण आले आहे. राजगुरूनगर पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *