पंढरपूर. कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाळा नेहेमीच गुणवत्ता, शिस्त आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी पंढरपूर मध्ये प्रसिद्ध आहे. प्राचार्या प्रियदर्शनी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास शिक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी इ. ८वी डी या वर्गात प्रत्यक्ष मतदान कसे करावे आणि कसे असते, याची यंत्रणाच उभी केली.
नागरिक शास्त्र विषयात आपली लोकशाही या अंतर्गत येणारी मतदान प्रक्रिया या विषावर प्रमोद क्षिरसागर यांनी यंत्र बनवले, ज्यात मुलांनी आपले मत टाकायचे होते. सदर प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्राचार्या सौ. प्रियदर्शनी सरदेसाई यांनी मुलाना मार्गदर्शन करताना लोकशाही बळकटी साठी मतदान किती महत्वाचे आहे यावर महत्व सांगितले.
त्यांनी मतदानाने कशा प्रकारे सरकार बनतात, त्यात मतदार राजा किती महत्वाचा असतो, हे समजावून सांगितले व मतदान प्रक्रिया सुरू केली.
त्यापूर्वी वर्गात आचार संहिता लागू करण्यात आली. या दरम्यान कोणीही दुसऱ्या मुलास खाऊ वाटप तसेच प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली. उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी 3 दिवसाची मुदत देण्यात आली. ज्यात एकूण चार उमेदवारांनी फॉर्म भरले. 1 दिवस हा फॉर्म माघे घेण्यासाठी देण्यात आला.2 उमेदवारांनी आपला फॉर्म मघे घेतला.त्यानंतर प्रगती खडके व व्यंकटेश डांगे हे दोन उमेदवारांना प्राचारासाठी वेळ देण्यात आला. यांना त्यांचे चिन्ह म्हणून डांगे व्यंकटेश याला रिक्षा तर प्रगती खडके हिला ढाल हे चिन्ह देण्यात आले ज्यात त्यांनी आपणच का वर्गासाठी योग्य उमेदवार आहे हे समजून सांगताना चोकलेट वाटप केले. प्रत्यक्षात मतदान झाल्या नंतर मतमोजणी करण्यात आली ज्यात व्यंकटेश डांगे हा अवघ्या 1 मतानी विजयी झाला. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी बूथ अधिकारी म्हणून संस्कृती गायकवाड,माळी समृध्दी, आदित्य पवार यांनी काम पाहिले तर प्रशासकीय अधिकारी व पोलिस अधिकारी म्हणून कल्याणी माने तसेच गौरव घोडके यांनी काम पाहिले.
मत मोजणी साठी शाळेतील शिक्षक समाधान पाटील व ऋषालि काळे यांनी काम पाहिले.
…………..
कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीतून मिळवली औद्योगिक माहिती
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेतील इ. आठवीचे विद्यार्थी प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शनी सरदेसाई यांच्या प्रेरणेतून अकलूज येथील शिवामृत दूध उद्योग समूह या ठिकाणी क्षेत्रभेटीस गेल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी तिथे तयार होणाऱ्या दूध व दुधापासून इतर पदार्थांची सर्व प्रक्रिया व निर्मिती कशी होते याविषयी माहिती मिळवून त्यांच्या मनामध्ये असणारे अनेक प्रश्न तेथील विभाग प्रमुखांना विचारून आपल्या मनातील शंकांना वाट मोकळी करून दिली. या विद्यार्थ्यांना प्रशालेतील भूगोल शिक्षक श्री सुनील लांडगे यांनी क्षेत्रभेटीसाठी अकलूज या ठिकाणी नियोजन करून शिवामृत दूध संघाचे मॅनेजर यांची विद्यार्थ्यांशी भेट घडवून दिली. तसेच अकलूज या ठिकाणी असणारी शिवसृष्टी विद्यार्थ्यांनी पाहून ऐतिहासिक शिल्पकृती व भित्तिशिल्प पाहण्याचा आनंद घेतला. त्याचबरोबर वेळापूर या ठिकाणी असणारे प्राचीन हेमाडपंथी अर्धनारी नटेश्वर मंदिर व परिसर पाहिला. अर्धनारी नटेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षक श्री गिरीश खिस्ते सर यांनी या मंदिराविषयी माहिती सांगितली. तसेच अकलूज येथील निसर्गरम्य वातावरणरूपी आनंदी गणेश मंदिरामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी दर्शन घेऊन वनभोजनाचा आनंद लुटला. या सर्व विद्यार्थ्यांसमवेत त्यांचे वर्गशिक्षक श्री सुधीर गोडसे व श्री प्रमोद क्षिरसागर आणि महिला शिक्षिका सौ. स्वाती बडवे, तेहमिना कोरबू या देखील उपस्थित होत्या. या सर्व विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीसाठी प्रशालेच्या प्राचार्या मा. प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी शुभेच्छा दिल्या.
…………..
संस्कृत ओलंपियाड स्पर्धेत कर्मयोगी विद्यानिकेतन चे भरघोस यश
पंढरपूर येथे कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाले मध्ये इयत्ता ९वी व १०वी च्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय भाषा ओलंपियाड संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या संस्कृत व्याकरण परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी १०० पैकी ९८,९७ अशा प्रकारे गुण प्राप्त करून विशेष प्राविण्य, प्रथम श्रेणी मिळवली. ही स्पर्धा संपूर्ण भारत देशामध्ये घेतली जाते. तसेच या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना शाळेतील क्रमांकानुसार प्रशस्तीपत्रक गौरवचिन्ह व रोख पारितोषिक दिले जाते. या सर्व विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षक गिरीश खिस्ते सर यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रशालेचे प्रमुख विश्वस्त श्री. रोहन परिचारक, प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी केले.
……………
कर्मयोगी मध्ये कला व हस्तकला महोत्सव
बाल-कलाकारांची कला आणि अजोड दृष्टीकोनातून साकारलेले कलादालन अप्रतिम चित्र, हाताने तयार केलेले एक ना एक प्रकारचे वेगवेगळे हस्तशिल्प थक्क करणारी कलाकृती याने कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे आज आर्ट अँड क्राफ्ट एक्सीबिशन भरवण्यात आले होते.
प्राचार्या डॉ. प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या संकल्पनेतून मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या शाळेमध्ये आर्ट अँड क्राफ्ट हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रदर्शनाची सुरुवात मा. भरत माळी साहेब यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली.प्रसंगी मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. पालकांना संबोधित करताना प्राचार्या. प्रियदर्शनी सरदेसाई म्हणाल्या, आज मोबाईल च्या युगात आपली संस्कृती तसेच मुलांमध्ये असलेल्या कलागुण यांची विसर पडत चालली आहे.त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच अभ्यास व्यतिरिक्त आपल्या संस्कृती चे दर्शन घडावे या हेतूने हे प्रदर्शन आयोजित केले आहे*.
या प्रदर्शनात वेगवेगळे प्रकारचे शिल्प, चित्र, मुलानी हाताने बनवलेले मातीचे भांडे, दिवे, प्राण्याचे चित्र, फुलदाणी, माठ, टोपी, काचेवर काढलेली चित्रं, राजमुकुट, पतंग, हात पंखे, वारली चित्र, काडीचे घरे, तिरंगा, पानांनी बनवले चित्र, काड्याच्यां साह्याने बनवलेले कलाकृती यांचे खुले प्रदर्शन आयोजित केले होते.
सदर प्रदर्शनात साठी मा. भरत माळी साहेब संस्थापक अध्यक्ष सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालय पंढरपूर, चित्रकला शिक्षक अमित वाडेकर, प्राध्यापक सचिन देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हे प्रदर्शन पार पाडण्यासाठी शाळेच्या शिक्षिका वृषाली काळे, चेतना पवार सह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.