👁 4 Views

Pandharpur Live News : पंढरीत पुन्हा तरुणाची आत्महत्या, क्रिकेटप्रेमी तरुणाच्या आत्महत्येनं पंढरपूर हळहळलं

Pandharpur Live News : पंढरीत पुन्हा तरुणाची आत्महत्या, क्रिकेटप्रेमी तरुणाच्या आत्महत्येनं पंढरपूर हळहळलं

Pandharpur Live News: पंढरपूर शहरातील एका तरुणाच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका तरुणाच्या आत्महत्येची घटना घडल्याने पंढरपूर हादरलंय.

पंढरपूर शहरातील ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या एका वीस वर्षाच्या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलंय.

सुजल संजय बंदपट्टे असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव असून त्याला क्रिकेटची विशेष आवड होती. क्रिकेट खेळात रस असलेल्या सुजलला क्रिकेटपटू व्हायचं होतं. यासाठी तो सतत सरावही करायचा. व्यायामाची आवड असणारा , अत्यंत सुस्वभावी व सर्वात मिळून मिसळून राहणारा सुजल अशा पध्दतीने टोकाचा निर्णय घेईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. त्याच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आज सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास सुजल घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पंढरपूर सामान्य रूग्णालयात नेला असुन पोलिसांची पुढील कार्यवाही चालू आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *