👁 2 Views

कॉलेजमधील प्रेमसंबंधातुन दोघांवर जीवघेणा हल्ला

कॉलेजमधील प्रेमसंबंधातुन दोघांवर जीवघेणा हल्ला

भवानीनगर: येथील कॉलेजमधील प्रेम संबंधाच्या कारणावरून दोन मुलांवर धारदार शास्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्ला करणार्‍या आरोपींना वालचंदनगर पोलिसांनी दोन तासांमध्ये जेरबंद केले.

अदनान मोहम्मद शेख (वय 19), पियुष प्रथम चव्हाण (वय 19), यशराज गणेश अरगडे (वय 19, सर्व रा. सणसर, ता. इंदापूर) याचबरोबर यात सामील असलेले दोन विधी संघर्षित मुले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रत्यक्षदर्शी व जखमी संचित बाळासो घोळवे (रा. भवानीनगर) यांच्याकडे सविस्तर चौकशी करून त्याची फिर्याद घेऊन वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि. 31) सकाळी साडेअकराच्या सुमारास भवानीनगर येथील संचित बाळासो घोळवे, सुजल संतोष जाधव व त्यांचे इतर मित्र येथील भवानीमाता मंदिरामध्ये बसलेले असताना अदनान शेख, ओम धुमाळ, पियुष चव्हाण, निखील शिंदे, यश अरवडे यांनी सुजल जाधव व संचित घोळवे यांना लाथा बुक्कयांनी मारहाण करत अदनान शेख व ओम धुमाळ यांनी त्यांच्याकडील लोखंडी कोयत्याने संचित घोळवे, सुजल जाधव यांच्यावर वार करुन ते पळून गेले. ओम धुमाळ याच्या नातेवाईकांमधील मुलगी हिच्या सोबत संचित घोळवे याचे प्रेम संबध असून त्याच कारणावरुन ओम धुमाळ व संचित घोळवे यांच्यात गुरुवारी (दि. 30) वाद झाला होता.

तो वाद दोघांनी आपापसांत मिटवून घेतला होता. परंतु आज पुन्हा वादावादी झाली. आणि लोखंडी कोयत्याने संचित घोळवे व सुजल जाधव यांच्यावर वार केले. त्यामध्ये सुजल जाधव याच्या डोक्यामध्ये जबर वार बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यावेळी सुजल जाधव हा रक्तभंबाळ अवस्थेमध्ये खाली पडल्याचे पाहुन वरील सर्व मारहाण करणारे मुले ही पळुन गेली. त्यानंतर सदर जखमी मुलास उपचारकामी भोईटे हॉस्पीटल मध्ये दाखल केले असुन त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर वालचंदनगर पोलीस स्टेशनची दोन पथके तयार करुन बारामतीच्या दिशेने रवाना केले असता सदर मुले ही बारामती वरुन पुणेच्या दिशेने जात असल्याची तांत्रिक माहिती प्राप्त होताच त्याचा सिनेस्टाईलने पाठलाग करुन त्यांना सुपा पोलीस स्टेशन हद्दीमधील मौजे जळगांव (ता. बारामती) या गावात गावकरी यांच्या मदतीने शिफातीने पकडले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *