मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजाचा आज बुधवारी (दि. २२) रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चास संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील, आमदार सुरेश धस उपस्थित राहणार आहेत.
मागील महिन्यात सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचादेखील पोलिस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे.
या दोन्ही प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करीत या मोर्चाचे आयोजन केले आहे.
हा मोर्चा बुधवारी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघणार आहे. या आक्रोश मोर्चामध्ये संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच खासदार बजरंग सोनवणे, संभाजीराजे छत्रपती येतील.


