12 NOVEMBER 2017
याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात अशोक चिमाजी घाडगे (वय 51), रा. देगाव, ता. पंढरपूर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दि. 12-11-2017 रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास यातील फिर्यादी व त्यांचा मुलगा देगाव येथील भैरवनाथ मंदिराजवळून मोटारसायकलवरून जात असताना आरोपी संतोष तुकाराम डांगे, रा. देगाव याने व इतर आरोपींनी “तुम्ही इकडे का आला?” असे विचारत फिर्यादीस शिवीगाळ केली. फिर्यादीच्या गचुरीला धरून त्यांना खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी सिताराम तुकाराम डांगे याने हातात दगड घेऊन फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर कपाळावर दगड मारला.
याबाबत आरोपी छाया तुकाराम डांगे, तिच्या दोन सुना, संतोष तुकाराम डांगे, सिताराम तुकाराम डांगे व अनिल बाबासाहेब चव्हाण (सर्व रा.देगाव) यांच्यावर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात भादंवि कलम 143, 147, 149, 324, 323, 504 अन्वयार्थ गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकाॅ. क्षीरसागर हे करीत आहेत.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




