👁 8 Views

मंत्रिमंडळ निर्णय न्युज 21 नोव्हेंबर… वीज वितरण प्रणाली आधुनिक व सक्षम करणार, राज्यातील साध्या यंत्रमागधारकांना कर्ज व्याजदरात पाच टक्के सवलत, आदिवासी विकास महामंडळ अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी नियुक्तीच्या निकषात बदल , मनरेगाच्या सोशल ऑडिटसाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापण्याचा निर्णय,

पंढरपूर Live 21 NOVEMBER 2017

भाग-1
मंत्रिमंडळ बैठक : 21 नोव्हेंबर  2017
एकूण निर्णय – 
ऊर्जा विभाग
वीज वितरण प्रणाली आधुनिक व सक्षम करणार
महावितरणच्या पायाभूत आराखडा-2
योजनेस मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ
          वीज वितरण प्रणालीच्या आधुनिकीकरण व सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या महावितरण कंपनीच्या पायाभूत आराखडा-2 योजनेस मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यास आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.या निर्णयामुळे राज्यातील ग्राहकांना योग्य प्रमाणात खात्रीशीर वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे.
झपाट्याने वाढणाऱ्या वीजेच्या मागणीमुळे महावितरण कंपनीच्या वीज वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण व सक्षमीकरण करणे आवश्यक ठरले होतेतसेच स्वयंप्रेरित वितरण नेटवर्कचे नियोजनही अत्यावश्यक होतेत्यानुसार या प्रणालीचे बळकटीकरण व विस्तार करतानाच तिची कार्यक्षमता वाढविण्यासाठी महावितरण कंपनीने पाच वर्षांच्या कालावधीकरिता पायाभूत आराखडा प्रकल्प-1 (इन्फ्रा-1) तयार केला होतात्यानंतर सर्व वर्गवारीतील ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार त्यांना नवीन विद्युत जोडण्या देण्यासाठी 2013 ते 2017 या कालावधीत पायाभूत आराखडा प्रकल्प-2 (इन्फ्रा-2) ही योजना राबाविण्यात येत आहेसद्यस्थितीत या प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी या योजनेस मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
या योजनेंतर्गत महावितरण कंपनीस उर्वरित समभागासाठी 2017-18 मधील 560 कोटी 80 लाख रुपयांची अर्थसंकल्पित तरतूद वितरित करण्यासह 2018-19 वर्षासाठी ऊर्जा विभागास उपलब्ध होणाऱ्या नियतव्ययातून प्रकल्पाचा उर्वरित खर्च भागविण्यासही मान्यता देण्यात आलीया योजनेचा एकूण खर्च 8304 कोटी 32 लाख इतका असून महावितरण कंपनी त्यातील 80 टक्के भांडवल (6643 कोटी 46 लाखवित्तीय संस्थांमार्फत आणि 20 टक्के भांडवल (1660 कोटी 86 लाख)शासनाकडून समभाग स्वरुपात उभारण्यात येत आहेशासनाच्या एकूण भागभांडवलापैकी 734 कोटी 51 लाख रुपयांचे भागभांडवल वितरित करण्यात आले आहे.
            या योजनेंतर्गत सद्यस्थितीतील वीज प्रणाली सक्षम करणेभविष्यात येणाऱ्या भार मागणीची उपलब्धता करणे,सुयोग्य दाबाचा व खात्रीशीर वीज पुरवठा करणेवितरण रोहित्रांच्या नादुरुस्तीचे प्रमाण कमी करणे आणि तांत्रिक व वाणिज्यिक हानी कमी करणे आदी कामे करण्यात येत आहेत. या योजनेच्या गुणवत्ता तपासणीसाठी महावितरणने तीन श्रेणी गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा अंगिकारली आहे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 
—–0—–

वस्त्रोद्योग विभाग
राज्यातील साध्या यंत्रमागधारकांना
कर्ज व्याजदरात पाच टक्के सवलत
राज्यातील यंत्रमाग उद्योगाला चालना देण्यासाठी साध्या यंत्रमागधारकांनी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजदरात पाच टक्के सवलत देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ राज्यातील 85 टक्के यंत्रमागधारकांना होणार असून प्रतिवर्ष 54 लाख रुपयांप्रमाणे पाच वर्षासाठी 2 कोटी 71 लाख रुपयांची तरतूद करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
राज्यात देशाच्या सुमारे 50 टक्के (12 लाख 70 हजारयंत्रमाग आहेतयापैकी 85 टक्के (10 लाख 79 हजार 500)यंत्रमाग साध्या स्वरुपाचे, जुन्या बनावटीचे किंवा स्थानिक उत्पादकांनी तयार केलेले आहेतया यंत्रमागावर देशात आवश्यक असणाऱ्या साधारण कापडाचे उत्पादन केले जातेउर्वरित 15 टक्के स्वयंचलित यंत्रमागावर निर्यातभिमुख व दर्जेदार कापडाचे उत्पादन केले जातेराज्यात यंत्रमागावर उत्पादित होणाऱ्या कापडापैकी केवळ 10 टक्के कापडाची राज्याला आवश्यकता असून उर्वरित 90 टक्के कापडाची इतर राज्यात किंवा परदेशात विक्री केली जातेयंत्रमाग व्यवसायातून राज्यातील सुमारे 30 लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत आहेशासनाच्या उद्योग विकास धोरणाला अनुसरून राज्यातील कापडनिर्मितीला चालना देणे आवश्यक होते.
त्याचप्रमाणे यंत्रमाग उद्योगासमोर प्रामुख्याने कापसाचे वाढलेले भावसूताची वेळीच उपलब्धता न होणेसूताच्या किंमतीत झालेल्या वाढीच्या तुलनेत कापडाला भाव न मिळणे आणि तुलनात्मक महाग वीज दर इत्यादी अडचणी आहेत.त्यामुळे यंत्रमागधारकांच्या अडचणी सोडविण्याबरोबरच कापड उत्पादनगुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीमध्ये वाढ करण्यासाठी या उद्योगाला व्याजात सवलतरुपी प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्यानुसार साध्या यंत्रमागधारकांनी या निर्णयापूर्वी घेतलेल्या कर्जाच्या पाच टक्के व्याज राज्य शासनामार्फत वर्षासाठी भरण्यात येणार आहेही व्याजदर सवलत पुढील पाच वर्षे अथवा संबंधित यंत्रमागधारकांच्या कर्जाच्या परतफेडीपैकी आधी येणाऱ्या कालावधीपर्यंत राहील. या योजनेस पाच वर्षानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाहीइतर बांधकाम किंवा जमिनीकरीता घेतलेल्या कर्जाची रक्कम या सवलतीसाठी पात्र असणार नाहीसवलतीचा लाभ घेणाऱ्या यंत्रमागधारकांना बँका किंवा वित्तीय संस्थांच्या कर्जाचे हप्ते वेळेत आणि नियमित भरणे आवश्यक राहणार आहेहप्ते वेळेवर न भरणाऱ्या यंत्रमागधारकांना व्याजदर सवलत मिळणार नाही.
साध्या यंत्रमागाच्या उभारणीसाठी साधारणपणे 14 ते 15 लाखापर्यंत खर्च येतोबँकेच्या धोरणानुसार खर्चाच्या 75टक्के रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध करुन दिली जातेत्यानुसार साध्या यंत्रमागधारकांपैकी 98 टक्के यंत्रमागधारकांनी विविध बँकांमार्फत 16 कोटी 97 लाख रुपयांचे कर्ज घेतले असून त्यातील 10 कोटी 81 लाख मुद्दल आणि 90 लाख रुपयांचे व्याज बँकांना देणे बाकी आहेया मुद्दलावरील टक्क्याप्रमाणे प्रतिवर्षी 54 लाख हजार रुपये आणि पाच वर्षासाठी सुमारे दोन कोटी 71 लाख रुपयांची सवलत देण्यात येणार आहेत्यापैकी चालू वर्षासाठीचा खर्च विभागाकडे बचत होत असलेल्या निधीतून पुनर्विनियोजनाद्वारे भागविण्यास व पुढील वर्षासाठी अतिरिक्त नियतव्य उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 
—–0—–

आदिवासी विकास विभाग
आदिवासी विकास महामंडळ
अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी
नियुक्तीच्या निकषात बदल  
            महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  या निर्णयामुळे महामंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी आता आदिवासींच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकासासाठी उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तीचीही नियुक्ती करता येणार आहे.
            महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची स्थापना 1972 मध्ये सहकारी संस्था अधिनियमानुसार करण्यात आलेली आहे. आदिवासी समुहातील शेतकरी, कारागीर, भूमीहीन मजूर आदींचा विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने हे महामंडळ स्थापन करण्यात आले असून त्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. या महामंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद हे पदसिद्ध असून त्यावर अनुक्रमे आदिवासी विकास मंत्री आणि आदिवासी विकास राज्यमंत्री यांची निवड करण्यात येते.  या महामंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी आदिवासी विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचीही निवड व्हावी या उद्देशाने महामंडळाच्या संरचनेमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार पोटनियमात दुरुस्ती करून महामंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदावर आदिवासी विकास विभागाचे मंत्री आणि याच विभागाचे राज्यमंत्री यांच्यासह आदिवासी विकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची नियुक्ती करणे शक्य होणार आहे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 
—–०—–
        रोजगार हमी योजना
मनरेगाच्या सोशल ऑडिटसाठी
स्वतंत्र यंत्रणा स्थापण्याचा निर्णय
            महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) राज्यात हाती घेण्यात आलेल्या कामांचे स्वतंत्र यंत्रणेमार्फत सामाजिक अंकेक्षण (सोशल ऑडिट) करण्यासाठी स्वतंत्र सामाजिक अंकेक्षण सोसायटीची स्थापना करण्यासआज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
            केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कामांचे प्रत्येक सहा महिन्यांनी स्वतंत्र यंत्रणेमार्फत सामाजिक अंकेक्षण (Social Audit) करणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेचे नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण करण्यासह केंद्र शासनाला वेळोवेळी अहवाल पाठविण्यासाठी स्वतंत्र सामाजिक अंकेक्षण सोसायटीची स्थापना करण्यात येणार आहे. सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेची प्रसिद्धी व बळकटीकरण करणे, हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट्य राहणार आहे.
            सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी ग्रामसभांची क्षमता वाढविणे, मूळ हितसंबंधित घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, जनतेच्या हक्कांचे ज्ञान असलेल्या आणि त्याबाबत अनुभव असणाऱ्या इतर नागरी संस्था, संघटनांमधील कार्यकुशल व्यक्तींची निवड करून त्यांना प्रशिक्षण देणे, सामाजिक अंकेक्षणाची मार्गदर्शक तत्त्वे व नियम पुस्तिका तयार करणे, ग्रामसभांमध्ये विचारविनियम केल्यानंतर अंकेक्षणाचे कामकाज योग्यरित्या पार पाडणे, कृती अहवालांसह सामाजिक अंकेक्षणाचा अहवाल सार्वजनिक संकेतस्थळावर प्रदर्शित करणे इत्यादी कामे ही सोसायटी करणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्वसाधारण सदस्य मंडळ, नियामक मंडळ आणि कार्यकारी मंडळाचाही या संस्थेच्या रचनेत समावेश आहे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 
—–0—–
जलसंधारण विभाग
जलयुक्त शिवारमधील कामांचा
महामार्ग विकासाला लाभ होणार
दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात येत असलेल्या मृद व जलसंधारणाच्या कामांमधून उपलब्ध होणारी मुरुम, माती, दगड इत्यादी गौण खनिजे केंद्र शासन विकसित करत असलेल्या महामार्गाच्या बांधकामासाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला. या निर्णयामुळे जलयुक्त शिवार अभियानातून होणाऱ्या कामांची महामार्ग विकास कार्यक्रमांशी सांगड घातली जाणार आहे. 
            राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देशभरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची विकास कामे करण्यात येत आहेत. या बांधकामासाठी लागणारी मुरुम, दगड, माती इ. गौण खनिजांची गरज भागवण्यासाठी संबंधित ठेकेदार शेतकऱ्यांकडून अथवा राज्य शासनाच्या गौण खनिज नियमामध्ये असलेल्या तरतुदीचा अवलंब करुन उपलब्ध करुन देतात.
जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत टंचाई निवारणासाठी राज्यातील अनेक गावांची निवड करण्यात आली असून या गावांमध्ये नाला खोलीकरण-रुंदीकरण, पाझर तलाव-साठवण तलावांमधून गाळ काढणे तसेच  मागेल त्याला शेततळे कार्यक्रमांतर्गत शेततळ्यांचे निर्माण आणि मृद व जल संधारणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येत आहेत. संबंधित शेतकरी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्य संबंधित प्राधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील जलसंधारणाच्या या कामांची सांगड महामार्ग विकास कार्यक्रमाशी घालण्यासाठी आज हा निर्णय घेण्यात आला. जलसंधारणाच्या या कामांमधून उपलब्ध होणारी गौण खनिजे रस्त्यांच्या बांधकामासाठी कंत्राटदारांना स्वामित्वधन व अर्ज फी न आकारता केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या सूचनांनुसार महामार्ग विकास कार्यक्रमाशी जोडण्याचा उद्देश त्यामागे आहे. यानुसार कंत्राटदारासाठी लागू करण्यात आलेल्या अटीनुसार रस्ते बांधकामासाठी आवश्यक मुरुम, दगड, माती उपलब्ध व्हावी म्हणून ही गौण खनिजे महामार्ग विकास प्रकल्पांवरच वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच त्यांना या गौण खनिजांची विक्री करता येणार नाही. खोदकामाच्या ठिकाणापासून प्रकल्प स्थळापर्यंत रस्ता उपलब्ध नसल्यास असा पोहोच रस्ता संबंधित कंत्राटदाराला तयार करावा लागणार आहे. तसेच हे धोरण नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी सुद्धा लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *