👁 6 Views

हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना अभिवादन…. महाराष्ट्र शासन आज दि. 21 नोव्हेंबर रोजीचे महत्वाचे कार्यक्रम व त्यासंबंधी बातम्या

पंढरपूर Live 21 NOVEMBER 2017

हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना अभिवादन
मुंबईदि 21 : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण  करून अभिवादन केले.
यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री सुभाष देसाईगृह राज्यमंत्री दीपक केसरकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव सुमित मलिक, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरकोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटीलमुंबई शहर जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनीही यावेळी पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे ० ० ०
सचिन गाढवे/वि.सं.अ./21.11.2017
वि. 7301                                                                                30 कार्तिक, 1939 (स.9.15)
                                                                                               दि. 21 नोव्हेंबर 2017
शिक्षण मंत्र्यांकडून हुतात्म्यांना अभिवादन
मुंबईदि 21 : संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हुतात्मा स्मारक येथे पुष्प अर्पण  करून अभिवादन केले.
000
वि. 7302                                                                                30 कार्तिक, 1939(स.11.50)
                                                                  दि. 21 नोव्हेंबर 2017

दिलखुलास मध्ये ज्येष्ठ पार्श्वगायिका पुष्पा पागधरे यांची मुलाखत
            मुंबई. दि. 21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात लता मंगेशकर पुरस्कार्थी ज्येष्ठ पार्श्वगायिका पुष्पा पागधरे यांची  मुलाखत आकाशवाणीवरून बुधवार दि. 22 आणि गुरुवार दि. 23नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत रुपलक्ष्मी शिंदे -चौगुले यांनी घेतली आहे.
        सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून देण्यात येणारा प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कार मिळाल्यानंतरची भावनाअनेक दिग्गज गायकांसोबत काम करताना आलेला अनुभवमराठीसोबतच भोजपुरीउडियाबंगाली मारवाडी आदी प्रादेशिक भाषांमध्ये गायलेली गाणीप्रचंड लोकप्रिय ठरलेले इतनी शक्ती हमे देना दाता हे गाणेया गाण्याच्या निर्मितीमागील पार्श्वभूमीगायन क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवीन पिढीला दिलेला संदेश आदी माहिती श्रीमती पागधरे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे. 

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 0 0 0
वि. 7303                                                                                30 कार्तिक, 1939(दु.2.40 वा.)
                                                                  दि. 21 नोव्हेंबर 2017
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चर
 लोगोचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
 मुंबईदि. 21 : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सइंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चरच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी संस्थेच्या शतक महोत्सवी वाटचालीला मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या शतक महोत्सवी दशकाला सुरुवात झाली आहे. शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सइंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडेलचावरिष्ठ उपाध्यक्ष अमित कामतललीत गांधीसमीर दुधगावकरकरुणाकर शेट्टी यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 000
शैलजा वाघ-दांदळे/वि.सं.अ./21.11

वि. 7304                                                                                30 कार्तिक, 1939(दु.3.40 वा.)
                                                                  दि. 21 नोव्हेंबर 2017
अकृषी विद्यापीठांच्या बृहत आराखड्यांना मंजुरी
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
               
मुंबई, दि. 21 : मुंबई वगळता राज्यातील अकृषी विद्यापीठांनी सादर केलेल्या बृहत आराखड्यांच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्ती करण्यात आली होती. या तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालानुसार पाच विदयापीठाच्या बृहत आराखड्यांना अंतिम मंजुरी देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची आढावा बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार दर पाच वर्षाने तयार केलेल्या बृहत आराखड्यांना महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची परवानगी घेणे आवश्यक असते. त्यानुसार राज्यातील अकृषी विद्यापीठातील बृहत आराखडे यांना मंजुरी देणे यासाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली होती. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद,मुंबई विद्यापीठमुंबईगोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीशिवाजी विद्यापीठ कोल्हापूरया विद्यापीठांनी मांडलेल्या बृहत आराखड्यांमध्ये नवीन महाविद्यालयपरिसंस्थाअभ्यासक्रमविद्याशाखाविषय यांचा समावेश आहे. या बृहत आराखड्यांची जाहिरात करण्यासही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोग (माहेड) संदर्भातील बैठक आज मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडेउच्च व तंत्र शिक्षण राज्य मंत्री रवींद्र वायकरउच्च्र व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव मीता राजीव लोचननियोजन विभागाचे प्रधान सचिव आर. श्रीनिवासन,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसचिव सिध्दार्थ खरातशिक्षण संचालक माने आदी उपस्थित होते.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे ००००
वि. 7305                                                                                30 कार्तिक, 1939(दु.3.40 वा.)
                                                                  दि. 21 नोव्हेंबर 2017
झोपुच्या नवीन संकेतस्थळाचा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबईदि. 21 : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने नव्याने तयार केलेल्या संकेतस्थळाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला.
यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकरझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूरसचिव संदिप देशमुख उपस्थित होते.
या नव्याने आकर्षक केलेल्या संकेतस्थळाचे वैषिष्ट्य म्हणजे झोपडपट्टी धारकांना वेळोवेळी उपयुक्त माहिती मिळेल. त्यांना ऑनलाईन तक्रार करता येईल. तसेच संपूर्ण शासन निर्णयनिविदाझोपुच्या कामांची सद्यस्थितीअधिकाऱ्यांचे ई-मेलदूरध्वनी क्रमांक या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे ००००

वि. 7306                                                                                30 कार्तिक, 1939(सायं.5.20 वा.)
                                                                  दि. 21 नोव्हेंबर 2017
हमीभाव खरेदी केंद्रावर त्वरित ग्रेडर नेमावेत
पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे निर्देश
मुंबईदि. 21 : सोयाबीनउडीद आणि मुगाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर ग्रेडर नेमण्याबाबत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी दिलेल्या आदेशानुसार तात्काळ कार्यवाही करावीअसे निर्देश पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले.
राज्यातील  सोयाबीनउडीदमूग खरेदी केंद्रांबाबत आढावा घेण्यासाठी श्री. खोत यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा दालनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीस आमदार समीर कुणावारसंगीता ठोंबरेडॉ. पंकज भोयर, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे वरिष्ठ व्यवस्थापक अविनाश पांडेपणन महामंडळाचे सरव्यवस्थापक कल्याण कानडेपणन सहसंचालक ए. एल. घोलकर,बीडच्या जिल्हा पणन अधिकारी संध्या पांडव आदी उपस्थित होते.
श्री. खोत पुढे म्हणाले कीहमीभाव खरेदी केंद्रांवर उद्दीष्टाप्रमाणे खरेदी करुन शेतकऱ्यांना दिलासा  देणे आवश्यक आहे. शेतमालाच्या खरेदीसाठी पणन महासंघ आणि नाफेडने समन्वय राखून गतीने कार्यवाही करावी. या विभागांच्या अधिकाऱ्यांनी जिल्हानिहाय खरेदी केंद्रांवरील खरेदीचा नियमित आढावा घ्यावा. खरेदीचे प्रमाण कमी असलेल्या केंद्रांवरील अडचणी जाणून त्या तात्काळ सोडविण्याचे निर्देशही श्री. खोत यांनी दिले.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 0000
सचिन गाढवे/वि.सं.अ/21.11.2017

वि. 7307                                                                               30 कार्तिक, 1939(सायं.5.20 वा.)
                                                                  दि. 21 नोव्हेंबर 2017
डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियान नियोजित वेळेत पूर्ण करावे
          बबनराव लोणीकर
मुंबईदि. 21 : ग्रामीण भागातील गावांच्या समुहांचा आर्थिकसामाजिक आणि भौतिक विकास करण्यासाठी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियान राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प मिशन मोड म्हणून तीन वर्षाच्या कालावधीत पूर्ण करावाअसे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            मंत्रालयीन दालनात औरंगाबादबीडजालना या ठिकाणच्या शामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियानासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेआमदार प्रशांत बंबग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. लोणीकर म्हणाले, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रकल्प असून तो विहित वेळेत पूर्ण आवश्यक आहे. यासाठी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर प्रकल्पातील कामाची जबाबदारी निश्चित करावी. या प्रकल्पाच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल.
 हा प्रकल्प मिशन मोडवर घेण्याबाबतची मागणी श्री. लोणीकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करावाअशा सूचना ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचे श्री. लोणीकर यांनी सांगितले.
गाव समुहांचा विकास करताना केंद्र व राज्य शासनाच्या योजना एक केंद्रभिमुख पध्दतीने राबवून कौशल्य विकास प्रशिक्षणकृषी प्रक्रियास्टोरेज आणि गोदाममोबाईल आरोग्य युनिटशाळा सुधारणाउच्च शिक्षण सुविधास्वच्छतानळाद्वारे पाणीपुरवठाघन आणि द्रव कचरा व्यवस्थापनगावांतर्गत गटारेरस्त्यावरील दिवेगाव अंतर्गत रस्ते जोडणीसार्वजनिक वाहतूकएल. पी. जी. गॅस कनेक्शनडीजीटल साक्षरता आणि नागरिक सेवा केंद्र अशा बाबींचा विकास करणे गरजेचे असल्याचेही श्री.लोणीकर यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्यारुरबन अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या गावसमुहांच्या विकासासाठीचा सर्व निधी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेतून एक केंद्रभिमुखता (Convergence) द्वारे प्राप्त होणार आहे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनांव्यतिरिक्त स्थानिक गरजांच्या आवश्यकतेनुसार गावसमुहांच्या विकासासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता भासू शकते. उदा. एखाद्या गावसमुहामध्ये मोबाईल हेल्थ युनिट पुरविणेगावातील महिलांसाठी एखाद्या कुटीरोद्योग इ. प्रकारच्या गरजांसाठी योजनेंतर्गत कोणतीही तरतूद उपलब्ध नसते त्यामुळे स्थानिक गरजेनुसार अशी विकास कामे करण्यासाठी त्या संबंधीतला विस्तृत प्रकल्प अहवाल केंद्र शासनास सादर केल्यानंतर केंद्र शासनाच्या उणिवा निवारण निधी (Critical Gap Funding) मधून निधी उपलब्ध करुन दिला जातो.
हा निधी योजनांमधून मिळणाऱ्या निधीशिवाय अतिरिक्त निधी असतो. संपूर्ण उणिवा निवारण निधी हा केंद्र शासनामार्फत अभियानांतर्गत उपलब्ध करुन दिला जातो. निधी बिगर आदिवासी भागात प्रकल्प भांडवली मुल्याच्या 30 टक्के किंवा 30 कोटी रुपये यापैकी जो कमी असेल तो दिला जातो. तसेच आदिवासी भागात प्रकल्प भांडवली मुल्यांच्या 30 टक्के किंवा 15 कोटी रुपये यापैकी जो निधी कमी असेल तो दिला जातो असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
राष्ट्रीय रुरबन अभियानाची
बीड जिल्ह्यात होत आहे प्रभावी अंमलबजावणी
बीड जिल्ह्यामध्ये दीन दयाळ ग्रामीण कौशल्य विकास योजनेंतर्गत बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन नोकरी देण्यात येत आहे. गावांतर्गत रस्त्यांची कामे झालेली आहेत. परळी तालुक्यात 19 गावे हागणदारीमुक्त करण्यात आली आहेत. ही गावे स्मार्ट ग्रामच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. दीन दयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेंतर्गत शिरसाळा येथे 72 घरांच्या वसाहतीचे काम प्रगतीपथावर असल्याचे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 000
विष्णू काकडे/वि.सं.अ./21.11.17

वि. 7308                                                                               30 कार्तिक, 1939(सायं.5.25 वा.)
                                                                  दि. 21 नोव्हेंबर 2017
पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत
राज्य शासन सकारात्मक
– दीपक केसरकर
मुंबईदि. 21 : पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून लवकरात लवकर सर्व मागण्या प्राधान्याने सोडविण्यात येतीलअसे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज सांगितले.
           राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला पोलीस पाटील संघटनांचे प्रतिनिधीमहसूलसामान्य प्रशासन व गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
           श्री. केसरकर यांनी सांगितलेपोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत मुख्य सचिव यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे. मानधनात वाढ करण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीकडून अहवाल लवकरात लवकर मागविण्यात येईल. पोलीस पाटील यांच्या मानधनातून काही रक्कम कपात करून ती निवृत्तीनंतर देता येईल का याबाबत पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
नक्षलवादी हल्ल्यात मृत्यू पावलेले परंतु शासनाच्या मदतीपासून वंचित असलेल्यांना 1 लाख रुपये मदत देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येतीलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.
           उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार निवड शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधिक्षकांना अधिकार देण्यात येतील. पोलीस पाटील यांना विभागीय आणि जिल्हास्तरावरून प्रशिक्षण देण्याबाबत त्वरित संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करावी व प्रशिक्षणाचा अहवाल कालबद्धरित्या देण्यात यावाअसे निर्देश श्री.केसरकर यांनी दिले.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *