पंढरपूर Live 21 NOVEMBER 2017
प्रधानमंत्री पीक विमा योजनत रब्बी ज्वारीसाठी
30 नोव्हेंबर पर्यंत सहभाग नोंदविण्याचे आवाहन
सोलापूर दि. 21 :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेत रब्बी हंगाम 2017-18 मध्ये रब्बी ज्वारी पिकासाठी सहभागी होण्यास 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत सवलत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार यांनी कळविले आहे. सन 2017-18 मध्ये रब्बी हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेत समाविष्ठ करण्यात आलेली पिक शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता खालीलप्रमाणे
|
अ.क्र.
|
पिकाचे नांव
|
विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर
|
शेतकरी हिस्सा प्रति हेक्टरी
|
विमा कंपनीचे नाव व पत्ता
|
|
|
विमा हप्ता दर टक्के
|
विमा हप्ता रक्कम रू.
|
||||
|
1
|
गहू (बा)
|
33000
|
1.50
|
495
|
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मंडळ कार्यालय तिसरा मजला स्टीलिंग सिनेमा बिल्डींग 65 मर्झबान रोड, मुंबई 01 दूरध्वनी क्र.
022-22067215
टोल फ्री क्रमांक
180 02007710
|
|
2
|
गहू (जि)
|
30000
|
1.00
|
300
|
|
|
3
|
ज्वारी (बा)
|
26000
|
1.50
|
390
|
|
|
4
|
ज्वारी (जि)
|
24000
|
1.50
|
360
|
|
|
5
|
हरभरा
|
24000
|
1.50
|
360
|
|
|
6
|
करडई
|
22000
|
1.50
|
330
|
|
|
7
|
सुर्यफुल
|
22000
|
1.50
|
330
|
|
|
8
|
ऊ भुईमुग
|
36000
|
1.50
|
540
|
|
|
9
|
रब्बी कांदा
|
60000
|
5.00
|
3000
|
|
प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेचा सहभाग घेण्यास पात्र आहेत. नैसर्गिक आपत्ती किड आणि रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. पीक पेरणी पासुन काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपिट, चक्रीवादळ, पूर, भूसख्खलन, दुष्काळ, पावसातील खंड किड व रोग हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थिमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान काढणी पाश्चात नुकसान इ. जोखमीच्या बाबी सदर योजनेत समावेश करण्यात आला आहे.
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यानी ज्वारी (बागायत), ज्वारी (जिरायत) – 30 नोव्हेंबर 2017, गहू (बागायत), गहू (जिरायत) हरभरा, करडई, सुर्यफुल, कांदा दिनांक 31 डिसेंबर 2017 आणि उन्हाळी भात, उन्हाळी भुईमुग या पिकासाठी दिनांक 31 मार्च 2018 पर्यंत बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करावेत.
ज्वारी बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज राष्ट्रीयकृत बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सोलापूर यांचेमध्ये स्विकारले जातील. रब्बी हंगाम 2017 -18 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांचे अर्ज / विमा हप्ता कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जातील. या करिता 7/12 उतारा, अधिसुचित पिकाची पेरणी केले प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खात्याचा तपशिल देणे शेतकऱ्यांसाठी बंधनकारक आहे. तरी सदर योजनेत सहभागी होणेसाठी शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सोलापूर यांचे अधिनस्त कार्यरत असलेल्या शाखाशी तात्काळ संपर्क साधावा अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी सोलापूर, पंढरपूर, कुर्डूवाडी तसेच तालुका कृषि अधिकारी संबंधित मंडळ कृषि अधिकारी , कृषि सहाय्यक यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बसवराज बिराजदार यांनी केले आहे.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




