👁 8 Views

कोपर्डीच्या निर्भयाला श्रद्धांजली; न्यायव्यवस्थेवरचा विश्वास दृढ झाल्याच्या प्रतिक्रिया



पंढरपूर Live 30 NOVEMBER 2017

निलेश चाळक  बीड :  कोपर्डी (जि. अहमदनगर) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खुनाच्या गुन्ह्यातील तिन्ही दोषींना बुधवारी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. या निकालानंतर कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळाल्याच्या प्रतिक्रिया बीडमध्ये उमटल्या. न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढला असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. महिला पदाधिकाºयांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याजवळ निर्भयास श्रद्धांजली वाहिली.

कोपर्डी येथे १६ जुलै २०१६ रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले. कोपर्डी घटनेनंतर संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. ठिकठिकाणी लाखोंचे मोर्चे निघाले होते व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी झाली होती. बुधवारी न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.

या निकालानंतर बीडमध्ये सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिला एकत्रित आल्या. निर्भयाच्या मारेकºयांना शिक्षा झाल्याशिवाय तिला श्रद्धांजली वाहणार नाहीत अशी शपथ महिलांनी घेतली होती. न्यायालयाने तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर महिला पदाधिकारी एकवटल्या. राजीव गांधी चौकातील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित येऊन महिलांनी मेणबत्त्या पेटवून निर्भयाला श्रद्धांजली वाहिली. यावेळी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करण्यात आले.
.
महिलांमधील असुरक्षिततेची भावना यामुळे दूर होईल व अशा प्रकारचे गुन्हे करण्याचे धाडस यापुढे कोणी करणार नाही असा विश्वास महिलांनी व्यक्त केला.

महिलांना बळ देणारा निकालकोपर्डीची घटना माणुसकीला काळिमा फासणारी होती. न्यायालयाने दिलेला निकाला महिलांना बळ देणारा आहे. ज्या महिला, मुलींवर अत्याचार होतो, त्यांच्या मागे शासन- प्रशासन खंबीरपणे उभे आहे. मात्र, या निकालामुळे अशा घटनांना पायबंद बसेल. अशा घटनांतील पीडितेला तात्काळ न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा आहे.पंकजा मुंडे, पालकमंत्री

निकाल समाधानकारककोपर्डी प्रकरणात न्यायालयाने दिलेला निकाल समाधानकारक आहे. महिला अत्याचाराविरुद्ध शासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. महिला अत्याचाराची प्रकरणे जलदगती न्यायालयात चालविली पाहिजेत, तरच कोपर्डीसारख्या घटना होणार नाहीत.आ. जयदत्त क्षीरसागर

महिला सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निकालकोपर्डीत जे काही घडले ते अत्यंत वाईट होते. दीड वर्षांनतर निर्भयाला न्याय मिळाला. या निकालामुळे न्यायव्यवस्था महिला अत्याचाराची प्रकरणे संवेदनशीलपणे हाताळत असल्याचे सिद्ध झाले. महिला सुरक्षेच्या दृष्टीने हा निकाल अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे पीडित महिला पुन्हा समाजात खंबीरपणे उभ्या राहतील असा विश्वास आहे.डॉ. योेगेश क्षीरसागर, नगरसेवक


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *