पंढरपूर Live 30 NOVEMBER 2017
■ महादेव गित्ते, परळी वैजनाथ / (प्रतिनिधी ) :-
काळभैरवाची ठीकाणे खुपच कमी आसुन धार्मिक भाविकांसाठी दर्शनाचा दुर्मिळ योग परळी तालुक्यात मांडवा येथे जुळून येतो.श्री क्षेत्र परळी वैजनाथची पंचक्रोषी असंख्य देवतांच्या स्थानांनी परीपुर्ण आहे.आंध्र,तेलंगणा या राज्यातील मथुरा लभान समाजाच्या भाविकांचे श्रद्धा स्थान असलेले हे मराठवाड्यातील एकमेव काळभैरव देवस्थान असुन या ठिकाणी दरवर्षी मोठा यात्रात्सोव असते.यावर्षी हा यात्रात्सोव 3 डिसेँबरला होणार आहे .
परळी वै.तालुक्यातील मांडवा येथे मार्गशिर्ष पोर्णिमेला श्री.काळभैरवाची मोठी यात्रा भरते.या यात्रेला दरवर्षी मराठावाड्यासह परराज्यातील आंध्र प्रदेश ,तेलंगणा येथील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात .आंध्रातील लभान समाजातील भाविक येथील श्री.काळभैरवाला आपले कुलदैवत मानत असल्याने मोठ्या प्रमाणात हे भाविक सहकुटुंब या ठिकाणी दोन तिन दिवस अगोदर यात्रेला आवर्जून उपस्थित राहतात . तर जिल्ह्यातील मल्ल(पेलवान) हे देखील येथिल याञत्सोवा दरम्यान आपली कुस्ती खेळण्यासाठी इच्छूक असतात.
याञात्सोवा दरम्यान ग्रामस्थाकडुन विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात .त्याचबरोबर लभान समाजाचे पारंपारिक धार्मिक विधी, उत्सव याच ठिकाणी पुर्ण केले जातात .मांडवा गावकर्यांच्या वतीनेही याप्रसंगी भजन ,कीर्तन ,नामसंकीर्तन, पालखी सोहळा आदी धार्मिक कार्यक्रम तसेच जिल्ह्यात नामवंत मल्ल(पेलवान) यांच्यासाठी कुस्तीच्या दंगली आयोजित केल्या जातात. भक्त आपले विविध संकल्प,नवस यावेळी पुर्ण करतात.
काळभैरवाच्या दर्शनासाठी याठिकाणी मोठी गर्दी होते.यावर्षी महापुजा, पालखी सोहळा व महाप्रसाद , याञात्सोव 3 डिसेंबर रोजी तर जिल्ह्यातील मल्लासाठी(पेलवान) कुस्तीच्या दंगली 4 डिसेंबर रोजी होणार आहेत
या यात्रेची जय्यत तयारी पुर्ण पणे करण्यात आली आहे. मांडवा नगरी याञात्सोवा मुळे सजून निघाली आहे. भाविक भक्तांनी या यात्रेचा व श्री.काळभैरव दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मांडवा गावकर्यांनी केले आहे.
*देवस्थान च्या विकासाचा अनुशेष भरुन काढणे आवश्यक – मोहन साखरे*भाविकांच्या मुलभूत सुविधेच्या तुलनेत मनावा असा विकास झालेला नाही.महिला भाविक भक्तांना ऐन कडाकिच्या थंडीत उघड्यावर झोपावे लागते.भक्तिनीवासा नाही.अंघोळी साठी बाथरुम व शौचासाठी शौचालय नाही. देवस्थान च्या विकासाचा खूप मोठा अनूशेष भरुन काढणे बाकी तो भरुन काढणे गरजेचे आहे. जिल्ह्यात नामांकीत देवस्थाना पैकी एक हे देवस्थान पर्यटन स्थळ होऊ.येथे भौतिक सुविधा करणे गरजेचे आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





