पंढरपूर Live 1 December 2017
बीड (निलेश चाळक):- मुख्यमंञी देंवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत आज बीड मध्ये मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या हँलीकाँप्टर मधून राष्ट्रवादीचे आ,जयदत्त क्षीरसागर यांनी एँन्ट्री केल्यामुळे बीडच्या राजकिय वर्तूळात हा चर्चेचा विषय बनला आहे त्यामुळे बीडच्या राजकारणाची समीकरणे लवकरच बदलण्याची शक्यता आहे व तसेच गेली काही महिन्यांपासून राष्टवादीवर असलेली त्यांची नाराजी आणि मुख्यमंत्र्यांशी अचानक साधलेली जवळीक जिल्ह्याच्या राजकारणाची समिकरणे बदलाची नांदी ठरण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाच्या निमित्ताने बीड दौºयावर आले. पोलीस मुख्यालयावर त्यांचे हेलीकॉप्टर लॅन्ड झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचे कार्यकर्ते जसे उपस्थित होते, तसेच नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागरही उपस्थित होते. परंतु हेलीपॅडवर असलेल्या सर्वांना धक्का बसला जेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत आ. जयदत्त क्षीरसागरही हेलीकॉप्टरमधून उतरले.
पुन्हा दुसरा आणखी एक धक्का देणारी घटना म्हणजे सीएम तेथून थेट पोहोचले ते क्षीरसागर यांच्या बंगल्यावर. तेथे चहापान केल्यानंतर क्षीरसागर परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.
गेली काही दिवसांपासून राष्ष्टÑवादीत अस्वस्थ असलेल्या क्षीरसागर यांची राजकीय बदलाच्या समिकरणाची चर्चा सुरू असतानाच आता थेट मुख्यमंत्री यांच्याशी साधलेली जवळीक आगामी काळातील बदलाची नांदी तर नाही ना, अशीही चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे.
पुन्हा दुसरा आणखी एक धक्का देणारी घटना म्हणजे सीएम तेथून थेट पोहोचले ते क्षीरसागर यांच्या बंगल्यावर. तेथे चहापान केल्यानंतर क्षीरसागर परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.
गेली काही दिवसांपासून राष्ष्टÑवादीत अस्वस्थ असलेल्या क्षीरसागर यांची राजकीय बदलाच्या समिकरणाची चर्चा सुरू असतानाच आता थेट मुख्यमंत्री यांच्याशी साधलेली जवळीक आगामी काळातील बदलाची नांदी तर नाही ना, अशीही चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे.
राष्ट्रवादीकडून दुखावलेले जयदत्त क्षीरसागर व राज्याचे मुख्यमंत्री यांनी मुंबई ते बीड असा एकाच हेलिकॉप्टरने प्रवास केल्याने याची राजकीय वर्तुळात चवीने चर्चा केली जात आहे.
राष्ट्रवादीचे आ. जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून नसल्यासारखे आहेत. बीड जिल्ह्यात मागील सहा महिन्यापासून झालेल्या प्रत्येक कार्यक्रमापासून आ. क्षीरसागर हे दूर आहेत. मध्यतंरी आ. जयदत्त क्षीरसागर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात झाली होती. यावर आजवर जयदत्त क्षीरसागर यांनी मौन धारण केले होते. मात्र शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून आ. जयदत्त क्षीरसागर यांनी बीडमध्ये इंट्री केली अन् आ. क्षीरसागर भाजप च्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधान आले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





