👁 10 Views

ना. पंकजाताई मुंडे यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे फलित…. वैद्यनाथ कारखान्याचे डिस्टिलरी, वीज निर्मिती प्रकल्प पुन्हा नव्या जोमाने सुरू

पंढरपूर Live 1 December 2017
परळी (महादेव गित्ते):- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा ना. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजन आणि सुयोग्य यंत्रणेमुळे वैद्यनाथचे डिस्टिलरी व वीजनिर्मिती हे दोन्ही   संलग्न प्रकल्प पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले असून यातून प्रत्यक्ष उत्पादनाला देखील सुरुवात झाली आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या दृष्टीने ही फार मोठी उपलब्धी आहे. 
   लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी शेतकर्‍यांच्या भल्यासाठी सुरू केलेला हा कारखाना चालू रहावा यासाठी ना. पंकजाताई मुंडे यांनी गेल्या काही महिन्यांत खूप मोठे परिश्रम घेतले आहेत, मध्यंतरी अत्यल्प पाऊस आणि दुष्काळाचे सावट यामुळे ऊसाचे उत्पादन झाले नव्हते परिणामी   कारखान्यासह दोन्ही संलग्न प्रकल्प   बंद ठेवावे लागले होते. त्यामुळे शेतकरी व कारखाना या दोघांचेही खूप नुकसान झाले होते.  यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे प्रचंड  आर्थिक ओढाताण असताना देखील केवळ शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ना. पंकजाताई मुंडे यांनी गळीत हंगाम सुरू केला. शिवाय बंद असलेले डिस्टिलरी व वीजनिर्मिती प्रकल्पाला पुन्हा नवी ताकद दिली. 

डिस्टिलरीतून उत्पादनाचा शुभारंभ
कारखान्याच्या प्रतिदिन साठ हजार लिटर क्षमता असलेल्या अर्कशाळा (डिस्टिलरी ) प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादनाला आज ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते विधीवत पूजा करून सुरुवात करण्यात आली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून व मशिनरीची कळ दाबून ना. पंकजाताई मुंडेंनी उत्पादनाला प्रारंभ केला. कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, ज्येष्ठ श्रीहरी मुंडे, भाऊसाहेब घोडके,  कार्यकारी संचालक विठ्ठल दगडे, प्रकल्प मॅनेजर काळे, वीज प्रकल्पाचे पानढवळे आदी यावेळी उपस्थित होते. वैद्यनाथ साखर कारखान्याने मागील २१ दिवसात ८७ हजार ५०५ मे टन ऊसाचे गाळप करून  ५८ हजार साखर पोती उत्पादित केली असून २१ मेगा वॅट क्षमतेच्या  वीज निर्मिती प्रकल्पातून आतापर्यंत सुमारे ५० लाख युनिट वीज निर्माण केली आहे, ही वीज शासनाच्या वीज कंपनीला निर्यात केली जाते. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी साखर कारखान्यासह दोन्ही प्रकल्प पुन्हा नव्या जोमाने सुरू केल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदला आहे. 


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *