👁 8 Views

..अन्यथा कोळी महादेव जमातीचा एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही..!- गणेश अंकुशराव



पंढरपूर Live 1 December 2017

पंढरपूर (प्रतिनिधी):- आदिवासी विभागाकडून कोळी महादेव जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी पुन्हा ‘जातीचे दाखले हवेत!’ अशी जाचक अट घातली गेली आहे. कांही जणांचा अपवाद वगळता अनेक कोळी महादेव जमात बांधवांना सबळ पुरावे असूनही जातीचे दाखलेच मिळत नसल्यामुळे ‘जातीचे दाखले जोडले तरच शिष्यवृत्ती मिळेल!’ अशी अट घालून शासनाकडून कोळी महादेव जमातीवर फार मोठा अन्याय केला जात आहे. याविरोधात आज दि.30 नोव्हेंबर 2017 रोजी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी पंढरीतील आपटे उपलप प्रशालेत विद्यार्थ्यांसोबत आंदोलन केले. ‘‘जातीचे दाखले जोडण्याची अट शिथील करा! व पूर्वीप्रमाणेच शाळेच्या नोंदवहीवर जातीचा उल्लेख असलेल्या महादेव कोळी जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ द्या!’’ अशी मागणी केली. जर कोळी महादेव जमातीच्या विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्याच्या कारणावरुन संबंधीत शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही तर, ‘‘कोळी महादेव जमातीचा एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही!’’ असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
 
आादिवासी कोळी महादेव जमातीच्या मुलांना इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंत आदिवासी विभागाकडून शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळत होती. यासाठी तेंव्हा जातीचा दाखला जोडण्याची अट होती; परंतु महर्षी वाल्मिकी संघाने याविरोधात आंदोलन केले होते.  ‘‘ही अट शिथील करुन शाळेच्या नोंदवहीवर जर जातीचा उल्लेख असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळावी!’’ अशी मागणी आंदोलन करुन केली, त्यानुसार ही मागणी मान्य झाली होती. अशा लाभार्थी विद्यार्थ्यांचा प्रस्ताव सबंधीत शैक्षणिक संस्थेकडून पूर्वी आदिवासी विभागाकडे पाठविला जात असे व शाळेच्या नोंदवहीवर  ‘कोळी महादेव’ असा जातीचा उल्लेख असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळु लागला होता. परंतु ही प्रक्रिया आता शासनाने संगणकीय केली आहे. त्यानुसार आता प्रत्येक लाभार्थी विद्यार्थ्याने ऑनलाईन फॉर्म भरण्याची अट घातली आहे. हा फॉर्म भरताना त्यासोबत जातीचा दाखला जोडला जावा! ही जाचक अट पुन्हा घातलेली आहे. कोळी महादेव जमातीच्या बांधवांना पुरावे असूनही प्रांताधिकारी कार्यालयाकडून जातीचे दाखलेच मिळत नाहीत. त्यामुळे ही अट शिथील करुन कोळी महादेव जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा. अशी आमची मागणी आहे. 
शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही तोपर्यंत कोळी महादेव जमातीचा एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही! असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी आज आपटे उपलप प्रशालेतील आंदोलनादरम्यान दिला. यावेळी निलेश माने, शिवराज ननवरे, रामभाऊ कोळी, प्रशांत परचंडे, संकेत परचंडे, धीरज परचंडे, अक्षय सिताफ, पिंटु मोरे, अवधुत परचंडे, किरण पांढरे, आपटे उपलप प्रशालेतील कोळी महादेव जमातीचे सर्व विद्यार्थी  व महर्षी वाल्मिकी संघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *