👁 11 Views

कर्जमाफी नतंर ही शेतकरी आत्महत्या सुरूच :हिंगणी हवेली येथे शेतकर्याची गळफास घेवून आत्महत्या



पंढरपूर Live 3 December 2017

निलेश चाळक बीड :  शेतकर्याना कर्जमाफी देण्याची मागणी झाल्यानंतर राज्यसरकारने कर्ज माफी केली परंतू या कर्ज माफी नतंर ही शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत बीड तालूक्यातील हिंगणी हवेली येथे शेतकर्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .

मच्छिंद्र पांडुरंग पवार (३६) असं त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना चार वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. गावापासून जवळच असलेल्या शेतात ते कुटुंबासमवेत राहतात.  शेतीसाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. यंदा अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने देणे कसे फेडायचे ? या चिंतेने त्यांना ग्रासले होते. यातून त्यांनी शनिवारी टोकाचे पाऊल उचलले. पत्नी बाहेर गेल्यानंतर त्यांनी दोरीने आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी परत आल्यावर तिने हा प्रकार पाहिला अन् तिने आरडाओरड केली. शेजाऱ्यानी तातडीने तेथे धाव घेतली. त्यानंतर ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करुन त्याचे प्रेत फासावरुन खाली उतरविले. जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. बीड ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. 
मृत मच्छिंद्र पवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. 


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *