👁 9 Views

मराठवाडा साहित्य संमेलनाची जोरदार तयारी



पंढरपूर Live 3 December 2017

निलेश चाळक बीड-मराठवाडा साहित्य परिषद व जिल्हा परिषदेच्या वतीने २४  व २५  डिसेंबर २०१७  रोजी येथे होऊ घातलेल्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरु आहे. हे संमेलन ऐतिहासिक व्हावे या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले. संमेलन ठिकाणी पुस्तक,ग्रंथ विक्रीचे स्टॉल लावण्यासंदर्भात ग्रंथप्रदर्शन समिती तयार करण्यात आली आहे.या समितीच्या अध्यक्षपदी डॉ.राहुल धाकडे तर या समितीत प्रा.प्रशांत जगताप,विष्णू सरवदे, मुजीब काझी,दत्ता देवकते,उमेश नाईक, राम मंञी,विजय रापतवार यांचा समावेश आहे. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित या संमेलनस्थळी  महाराष्ट्रातील नामांकित प्रकाशन संस्था,प्रकाशन व्यावसायिक,ग्रंथ विक्रेते बंधू यांना स्टॉल लावण्याकरीता १०  बाय १२  फुटाची जागा व इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात येतील. तसेच संमेलन प्रांगणात उघड्यावर कुठेही पुस्तक विक्री करता येणार नाही. स्टॉल लावण्याकरीता नाममाञ शुल्क आकारण्यात येईल तरी महाराष्ट्रातील
इच्छुक नामांकित प्रकाशन संस्था,प्रकाशन व्यावसायिक व ग्रंथ विक्रेते बंधू यांनी सदरील नोंदणीसाठी दिनांक २०  डिसेंबर २०१७  पर्यंत ग्रंथप्रदर्शन समितीचे अध्यक्ष डॉ.राहुल  धाकडे यांच्या(मोबाईल क्रमांक – ९४२२४९६८८३ ) या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा व नोंदणी करून घ्यावी ,असे आवाहन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, संयोजन समितीचे उपाध्यक्ष अमर हबीब व संयोजन समितीचे कार्यवाह दगडू लोमटे, ग्रंथ प्रदर्शन समितीचे अध्यक्ष डॉ.राहुल  धाकडे यांनी केले आहे.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *