👁 9 Views

शिवसेनेचा वचननामा जाहीर ; भाजपाची कोंडी होणार ? “हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व” या प्रमुख मुद्दयावर गुजरात निवडणूक लढवणार



पंढरपूर Live 4 December 2017
शिवसेनेचा वचननामा जाहीर ; भाजपाची कोंडी होणार ?
“हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व” या प्रमुख मुद्दयावर गुजरात निवडणूक लढवणार

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या मंत्रावर निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते त्याच धर्तीवर गुजरातची निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता भाजपाची कोंडी होणार ? अशी चर्चा सुरु झाली आहे. राज्यात व केंद्रात भाजपसोबत युती करून सत्तेत आलेल्या शिवसेनेने पंतप्रधान मोंदीच्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मात्र स्वतंत्र स्तरावर तयारी सुरु केली आहे. “हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व” या प्रमुख मुद्दयावर गुजरात निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करत शिवसेनेने गुजरात विधानसभेचा वचननामा जाहीर केला आहे.

शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या विधानसभेच्या या वचनाम्यामध्ये गुजरातच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, सिंचन प्रकल्प, शेतमालाला योग्य भाव, सर्वाना विज जोडणी, तरुणांना रोजगार, जनेतेचे जीवनमान उंचावणाऱ्या विविध योजनांबरोबरच शेतकरी नवतरुण व गोरगरिबांचा सर्वांगिण विकासाच्या योजना पुर्ण करण्याचे वचन दिले आहे. त्याच प्रमाणे नर्मदा योजना पुर्णत्वास नेऊन गुजरातमधील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात मुबलक पाणी देण्याचेही वचनही शिवसेनेने गुजराती मतदार शेतकऱ्यांना दिले आहे. याबरोबरच व्यसनमुक्ती, महिला सबलीकरण, सुरक्षा, जिवनाश्यक वस्तुचे भाव, जीएसटी दरात कपात, सार्वजनिक शिक्षण, इत्यादी योजनावर या वचननाम्यात भर देण्यात आला आहे. तसेच समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याचे वचन देत गुजरातमधील पाटीदार समाजापुढे मतदानासाठी शिवसेनेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या वचनाम्यात शेतकरी कर्जमाफी, रोजगार, नर्मदा योजना, गोरगरीबांचा विकास, महिला सबलिकरण, या सारख्या प्रमुख विषयांवर जोर देण्यात आला आहे. गुजरातच्या जनतेसाठी शिवसेना एक सक्षम पर्याय असल्याचे सांगत. शिवेसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी गुजरातचे संपर्क प्रमुख राजुल पटेल, संघटक हेमराज शहा, सेनेचे गुजरात राज्य प्रमुख आणि गोध्राचे माजी आमदार हरेश भट्ट यांच्या उपस्थितीत हा वचननामा जाहीर केला. या वचनामा प्रसिध्द करताना भाजपने गुजरातमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर नेहमीच तडजोड केली असल्याचा आरोप करत गुजरातच्या जनतेमध्ये भाजपाबद्दल तिरस्कार निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे.




14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *