पंढरपूर Live 4 December 2017
परळी वैजनाथ (प्रतिनिधी, महादेव गीत्ते) ः- अपंगांच्या मागण्याकडे शासनाकडुन जाणिक पुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी जागतिक अपंग दिनी येत्या ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता. विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी तहसिलवर अधिकार्यांना खिचडी वाटो आंदोलन अपंग,अंध व विधवा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अपंगाचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले आहे.
शासन परिपत्रकानुसार अपंग व विधवांना २ रू किलो गहु व ३ रू किलो तांदुळ असे दरमहा किलो अन्न अंत्योदय योजने मार्फत देण्यात यावे.दरमहा १०००/- रू.संजय गांधी निराधार पगार सुरु करावा.अपंग विधवा यांना ताबडतोब रेशन कार्ड द्यावे. अपंग विमा योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे मोफत द्यावीत. ३% अपंग निधी व घरकुल देण्यात यावे, तालुक्यामध्ये अपंग समिती स्थान करावी. अपंग व विधवांची तहसिल मधील होणारी हेळसांड थांबवावी, अपंगाचे आधार कार्ड मोफत काढुन द्यावेत. अपंगासाठी तहसिलमध्ये वेगळी खिडकी देण्यात यावी. अपंगाचे प्रमाणपत्र परळी उपजिल्हा रुग्णालयातुन देण्यास चालु करावे.तसेच आंदोलनास येणार्या अपंग व विधवांनी आपली कागदपत्रे सोबत आणावीत व आदि मागण्यांसाठी जागतिक दिनाचे औचित्य साधुन येत्या मंगळवार,दि.०५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता. विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खिचडी वाटो अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व अपंग, विधवा व अंध बंधु-भगिणींनी या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व या अभिनव आंदोलनामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे असे अवाहन अपंगाचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






