पंढरपूर Live 4 December 2017
परळी वैजनाथ (प्रतिनिधी,महादेव गीत्ते ) ः- येथुन जवळच असलेल्या मलकापुर येथील जागृत देवस्थान श्री हनुमान मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम सुरु झाले आहे. कामाला गती असली असुन यासाठी भाविक भक्तांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
मलकापुर येथील श्री हनुमान हे अतिशय जुने देवस्थान असुन परिसरा मध्ये जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारा देव अशी या देवस्थानची ओळख आहे. या मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम ग्रामस्थांच्या पुढाकाराने सुरु झाले आहे. मंदिराचे काम अतिशय वेगाने सुरु असुन शिखरापर्यंत बांधकाम पुर्ण झाले. समोर सभामंडप उभारण्यात येणार असुन कमानही तयार करण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येत आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हनुमान मंदिराच्या या जिर्णोध्दाराच्या कामाला सढळ हाताने मदत करुन काम लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






