पंढरपूर Live 4 December 2017
प्रतिनिधी/ पंढरपूर
पंढरपूर तालुक्यामध्ये नुकतीच पोलीस पाटील भरती प्रक्रिया झाली. या जागेसाठी मोठ्या प्रमाणात परीक्षा दिली होती. मात्र या झालेल्या परीक्षेत ज्यांना लेखी परीक्षेत जादा मार्कस् मिळाले अशा उमेदवारांना मुलाखतीमध्ये त्या उमेदवारांना त्याचे नाव व गाव एवढाच प्रश्न विचारण्यात आल्याचा आक्षेप घेत या झालेल्या निवडी रद्द करून पुन्हा परीक्षा घ्याव्यात; अशी मागणी प्रांताधिकारी विजयकुमार देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पंढरपूर तालुक्यामधील नुकत्याच पार पडलेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांनी पोलीस पाटीलपदासाठी परीक्षा दिल्या. परंतु मुलाखतीमध्ये अधिकाºयांनी आर्थिक व राजकीय हितसंबंध जोपासत ही भरती प्रक्रिया पूर्ण केली असून याबाबत सखोल चौकशी व्हावी. तसेच लेखी परीक्षेत सर्वोच्च गुण असलेल्या उमेदवारास तोंडी परीक्षेत कमी गुण देवून नाकारण्यात आले आहे; याचीही चौकशी व्हावी. याशिवाय (अल्फाबिटीकल-अ,ब,क,ड,..) अडनावाप्रमाणे मुलाखती होत असताना काही उमेदवारांना सर्वांत शेवटी मुलाखतीस बोलावून त्यांना ज्यादा गुण देण्यात आले याचीही चौकशी करण्यात यावी.
महाराष्ट्र शासन निर्णयानुसार वर्ग क आणि ड च्या मुलाखती बंद केलेल्या असून सुद्धा मुलाखतीची प्रक्रिया का राबविली गेली?, या मुलाखतीसाठी शासनाकडून कोणती मार्गदर्शक तत्वे दिली होती? तसेच लेखी परीक्षेचे गुण मुलाखतीच्या अगोदर का प्रकाशित केले नाहीत? याच्याही चौकशीची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाद्वारे औदुंबर सुरेश कुसूमडे, शिवाजी नागनाथ हळणवर, राजू दत्तात्रय उकरंडे, ज्योती अंकुश गाजरे, कुमार तुकाराम वाघमारे, सदानंद विलास वाघमारे यांनी प्रांताधिकाºयांना निवेदन दिले आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तY, आयुक्तY, महसूलमंत्री, गृहराज्यमंत्री, व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत.
चौकट – निवड प्रक्रियेत पारदर्शकता नाही : झालेल्या निवडी या राजकीय पुढाºयांच्या हस्तक्षेप झाल्याचा संशय आम्हाला असून अधिकाºयांनी पारदर्शकतेचा बागुलबुवा केलेला आहे. या निवडी रद्द करून पुन्हा परीक्षा घ्याव्यात यासाठी आम्ही न्यायालयातही जाणार आहोत- औदुंबर कुसूमडे, शिवाजी हळणवर.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






