पंढरपूर Live 4 December 2017
पंढरपूर येथे हमाल भवन बांधण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले आहे. त्यांच्या त्या परिश्रमातूनच आज हमाल भवन ते दिमाखात उभे आहे. शिवाजीराव शिंदे यांनी शालेय जीवनापासून छात्रभारतीमध्ये कार्य केल्यामुळे त्यांना समाजकार्याचे आवड निर्माण झाली. पुढे डॉ. बाबा आढाव, यदोनाथ थत्ते, प्रा. सुभाष वारे, निळूभाऊ फुले अशा थोर विचारवंतांच्या सानिध्यात आल्यामुळे व त्यांच्या सामाजिक कार्याला गती मिळाली. शिवाजीराव शिंदे यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची हमाल पंचायतच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. या कार्यकाळात त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन डॉ. बाबा आढाव यांनी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या बैठकीमध्ये पुनश्च शिवाजीराव शिंदे यांची महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या सहचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातील मान्यवरांनी शिवाजीराव शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





