पंढरपूर Live 4 December 2017
वृ.वि. 7459 13 मार्गशीर्ष, 1939 (दु.3.30)
दि. 4 डिसेंबर, 2017
लंडनच्या महापौरांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
सार्वजनिक वाहतूक, वैद्यकिय पर्यटन क्षेत्रात
लंडनच्या सहकार्यामुळे नवा अध्याय सुरू होईल
– मुख्यमंत्री
· वर्ल्ड सिटीज कल्चरल फोरममध्ये मुंबई शहराला सदस्यत्व
· सदस्यत्वाच्या कागदपत्रावर मुंबई व लंडनच्या महापौरांच्या स्वाक्षऱ्या
मुंबई, दि. 4 : लंडन व मुंबई या दोन्ही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर साम्य आहे. लंडनच्या सहकार्याने मुंबईमध्ये आरोग्य, पर्यटन, चित्रपट, वाहतूक या विविध क्षेत्रातील एकमेकांच्या सहकार्यामुळे दोन्ही शहरांमधील मैत्रीचे नाते अधिक दृढ होईल. तसेच दोन्ही शहरांच्या संबंधामध्ये नवीन अध्याय सुरू होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
लंडनचे महापौर सादिक खान यांनी आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ब्रिटीश उपउच्चायुक्त स्क्रिस्पिन सिमॉन, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी जागतिक सांस्कृतिक मंचमध्ये (वर्ल्ड सिटीज कल्चरल फोरम) मुंबई शहराचा समावेश सदस्य शहर म्हणून करण्यासंदर्भातील कागदपत्रांवर महापौर सर्वश्री. खान व श्री. महाडेश्वर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय पर्यटन यांच्यासह इतर विविध क्षेत्रांत मुंबई आणि लंडनमध्ये वाढत्या सहकार्याबद्दल चर्चा झाली.
मुंबई ही सध्या भारताची आर्थिक राजधानी आहे. मात्र, मुंबईला आर्थिक व तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र म्हणून जगाच्या नकाशावर आणण्याचे आमचे ध्येय असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, लंडन शहरास मी यापूर्वी भेट देऊन तेथील वाहतूक व्यवस्था व नियंत्रण कक्षाची माहिती घेतली आहे. लंडनच्या वाहतूक व्यवस्थेच्या अनुभवाचा फायदा मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सुरळीत होण्यास नक्कीच मदत होईल. आखीव रेखीव अशा या शहराच्या प्रशासनाकडूनही खूप काही शिकण्यासारखे आहे.
मुंबईतील फिल्म सिटीचा पुनर्विकास करत आहोत. जुने तंत्रज्ञान काढून नवीन आधुनिक तंत्रज्ञानयुक्त फिल्म सिटी तयार करत आहोत. आधुनिक तंत्रज्ञानासाठी तसेच राज्यात सुरू करण्यात येणाऱ्या वैद्यकीय पर्यटनाच्या वाढीसाठी लंडन शहराचे मोलाचे सहकार्य मिळेल, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
भारतातील पाच शहरांच्या दौऱ्याची सुरूवात मुंबईतून करताना आनंद होत असल्याचे सांगून श्री. सादिक खान म्हणाले, मुंबई व लंडन ही जुळी शहरे आहेत. लंडनप्रमाणेच मुंबई सुद्धा आर्थिक, व्यापारी केंद्र आहे. लंडनमध्ये अनेक भारतीय नागरिक राहतात. तर लंडनचे उपमहापौर हे भारतीय वंशाचे आहेत. त्यामुळे एकमेकांचे बांधव आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्मार्ट सिटीची संकल्पना अतिशय चांगली असून यामध्ये सहकार्य करण्यास आनंद होईल. लंडनमध्ये चित्रपटांच्या निर्मितीसाठी असलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा बॉलिवूडला होईल.
उपउच्चायुक्त श्री. सिमॉन यांनी वैद्यकीय तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, आर्थिक व तांत्रिक आदी क्षेत्रात लंडन सहकार्य करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.
********
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
वेस्ट कोस्ट ग्रीन रिफायनरी प्रकल्प
स्थानिकांना विश्वासात घेऊन मोबदला
निश्चित करावा
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 4 : वेस्ट कोस्ट ग्रीन रिफायनरी हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असून एक लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाद्वारे आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणुक राज्यात होणार आहे. असा प्रकल्प राज्याच्या भाग्यात पुन्हा होणे नाही, त्यामुळे स्थानिकांना या प्रकल्पाचे महत्व समजवून सांगुन त्यांना द्यावयाच्या मोबदल्याची रक्कम निश्चित करून त्यांना विश्वासात घेऊनच पुढे काम सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
वेस्ट कोस्ट ग्रीन रिफायनरी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यात पश्चिम किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन या प्रकल्पाचे फायदे कंपनीने समजवून सांगावे,यासाठी याप्रकल्पाची माहिती सांगणारे सादरीकरण, फिल्म आणि इतर माध्यमातून प्रबोधन करावे. या प्रकल्पासाठी आपली जमीन देणा-या स्थनिकांना द्यावयाच्या मोबदल्याची रक्कम निश्चित करून जमिनीची मोजणीस सुरुवात करावी असे निर्देश त्यांनी अधिका-यांना दिले. हा मोबदला जास्तीत जास्त असावा असेही त्यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आदर्श असे मॉडेल तयार करावे, सर्वोत्तम सुविधांसह शाळा, दवाखाना यांचा समावेश असलेली वसाहत तयार करावी, झाडे, फळबागा, जमीन यासारख्या प्रत्येक बाबींचे योग्य मूल्यमापन करुन जास्तीत जास्त मोबदला द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. प्रकल्प आपल्या फायद्याचा आहे याबाबत स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे, त्यांचे समाधान व्हावे यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे मुखमंत्र्यांनी सांगितले.
प्रकल्प उभारताना कोणतीही कटूता शिल्लक राहू नये यासाठी सामंजस्याने प्रश्न सोडवावेत, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
या बैठकीला कामगार मंत्री संभाजी पाटील – निलंगेकर, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल यांच्यासह स्थानिक आमदार,वरिष्ठ अधिकारी, रिफायनरी कंपन्यांचे प्रतिनिधी, स्थानिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
००००
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
वृ.वि. 7457 13 मार्गशीर्ष, 1939 (दु.3.20)
दि. 4 डिसेंबर, 2017
लोकशाही दिनी 20 अर्जांवर कार्यवाही
दिव्यांगांना तात्काळ स्टॉल उपलब्ध करुन द्यावेत
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 4 : लॉटरी पद्धतीचा अवलंब करुन ठाणे महापालिकेने दिव्यांग अर्जदारांना तात्काळ स्टॉल उपलब्ध करुन द्यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
मंत्रालयात आज झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनी नागरिकांच्या विविध विभागांशी निगडित 20तक्रारींवर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी तात्काळ निर्णय घेतले. या दिनात ठाणे येथील 9 दिव्यांग अर्जदारांनी दिव्यांगासाठीचे स्टॉल मिळावेत यासाठी अर्ज केले होते. याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. या 103 व्या लोकशाही दिनामध्ये सामान्य प्रशासन विभाग, मदत व पुनर्वसन विभाग महसूल विभाग, नगरविकास विभाग,ग्रामविकास विभाग, जलसंपदा विभाग आदी विभागांशी संबंधित पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतील तक्रारींचा समावेश होता.
ठाणे येथील दिव्यांग अर्जदारांचे स्टॉल मिळण्यासाठीचे अर्ज स्वीकारुन महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या स्टॉलचा आढावा घ्यावा. त्यावर 1 महिन्याच्या आत माहिती घेऊन लॉटरी पद्धतीने संबंधितांना स्टॉल उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्तांना निर्देश दिले.
माजी सैनिक असलेले डहाणू (जि. पालघर) येथील रमेश विष्णू देशपांडे यांनी त्यांच्या शेतजमिनीवर अनधिकृतरित्या घरकुल, बंधारा व रस्त्याचे बांधकाम झाल्याबाबत तक्रार अर्ज केला होता. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले की, संबंधित अर्जदार हे माजी सैनिक असल्याने सरकारी खर्चाने त्यांच्या जमिनीची मोजणी करावी. मोजणीनंतर घरकुलाच्या जागेची संबंधित योजनेतून आजच्या शासकीय दराने पूर्णत: मोबदला द्यावा. तसेच बंधाऱ्याच्या भरावाचाही मोबदला दिला जावा. रस्त्याची मोजणी करुन वस्तुस्थिती स्पष्ट होईपर्यंत विस्तारीकरणाचे काम थांबविण्यात यावे. पुढील सर्व कार्यवाही जमिनीच्या मोजणीनंतरच करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावर श्री. देशपांडे यांनी समाधान व्यक्त केले.
आत्तापर्यंतच्या लोकशाही दिनात 1424 तक्रारींपैकी 1418 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित6 आणि आजच्या लोकशाही दिनात स्वीकृत करण्यात आलेल्या 20 अशा 26 तक्रारींवर आज निर्णय घेण्यात आला.
या लोकशाही दिनास सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, पोलिस महासंचालक सतीश माथूर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर- सिंह, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
००००
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
वृ.वि. 7458 13 मार्गशीर्ष, 1939 (दु.3.30)
दि. 4 डिसेंबर, 2017
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
अर्ज करण्यासाठी 9 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. 4 : राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले असून आता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी आता 9 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज करता येणार असून सदर अर्जासोबत 100 प्रमाणपत्राची मर्यादा रद्द करुन अर्जदाराने अर्जासोबत सादर केलेल्या सर्व ॲटॅचमेंट अपलोड करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अर्जदारांनी विहीत नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करून त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात दि. 14 डिसेंबर 2017 पूर्वी सादर करण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभागाचे उपसंचालक एन.बी.मोटे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.
राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित असून राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहस उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी जिजामाता क्रीडा पुरस्कार तसचे ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
सन 2014-15, 2015-16 व सन 2016-17 या वर्षासाठी मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम दिव्यांग खेळाडूंसह संघटक/ कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या ठरावासह दि. 9 डिसेंबर 2017 पर्यंत अर्जदाराने आपल्या कामगिरीचा तपशील देऊन विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीनेwww.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावा. तसेच ऑनलाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात 14 डिसेंबर 2017 पूर्वी स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह सादर करावी.
याबाबत अधिक माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर शासन निर्णय क्रमांक- राक्रीधो /2012/प्र.क्र 158./12/क्रीयुसे – 2 दिनांक 16 ऑक्टोबर 2017 चे अवलोकन करावे. हा शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे.
००००
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
००००
नंदकुमार वाघमारे/वि.सं.अ./4.12.2017
वृ.वि. 7460 13 मार्गशीर्ष, 1939 (दु.4.35)
दि. 4 डिसेंबर, 2017
‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य‘
‘जय महाराष्ट्र’मध्ये ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे
मुंबई, दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे यांची ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य‘ या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 5 डिसेंबर 2017 रोजी सायंकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका पल्लवी मुजूमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून. भारतीय संविधानाचे शिल्पकार, एक थोर समाजसुधारक, आर्थिक धोरणाचे धुरीण, एक व्यासंगी पत्रकार, कामगारांच्या न्याय अधिकाराचे लढवय्ये, शेतक-यांच्या प्रश्नासाठी जागरूक ज्ञानपुरूष व समताप्रेमी, निस्सीम ग्रंथप्रेमी असे भारतरत्न डॉ.बाबासाहेंब आंबेडकर यांच्या प्रत्येक क्षेत्रातील कार्याची सविस्तर माहिती ज्येष्ठ साहित्यिक पतंगे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






