विधानपरिषद प्रश्नोत्तरे :
महाराष्ट्र शासन आजच्या महत्वाच्या बातम्या
पंढरपूर Live 14 December 2017
मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्थेत 5 टक्के आरक्षण कायम– विनोद तावडे
नागपूर, दि. 14 : मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सोयी सुविधा देण्यामध्ये शासकीय व अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये 5 टक्के आरक्षण कायम ठेवण्यात आल्याचे शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबतचा प्रश्न सदस्य संजय दत्त यांनी विचारला होता. श्री.तावडे पुढे म्हणाले मुस्लिम समाजाला खाजगी विनाअनुदानित संस्थांमध्ये प्रवेश व शासकीय सेवेतील भरतीसाठी दिलेल्या आरक्षणाला उच्च न्यायालायाने स्थगिती दिली आहे. सदर अद्यादेशाचे 23 डिसेंबर 2014 पर्यंत कायद्यात रुपांतर न झाल्याने सदर अध्यादेश व्यपगत झाला. हे प्रकरण उच्च न्यायालयात अंतीम निर्णयासाठी प्रलंबित आहे. या चर्चेत सदस्य सर्वश्री शरद रणपिसे, भाई जगताप, विक्रम काळे श्रीमती हुस्नबानू खलिफे यांनी भाग घेतला.
००००
अनुदानास पात्र शाळांना 20 टक्के अनुदानाचे वितरण– विनोद तावडे
नागपूर, दि. 14 : राज्यातील कायम विनाअनुदानावरुन अनुदानास पात्र शाळांना सरसकट 20 टक्के अनुदान वितरित केल्याचे शिक्षण मंत्री तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य डॉ.सुधीर तांबे यांनी शाळांच्या अनुदानाबातचा प्रश्न विचारला होता. श्री.तावडे म्हणाले दि. 1 व 2 जुलै 2016 च्या शासन निर्णयामुळे अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळांना अनुदान मंजूर करण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही सुरु आहे. या चर्चेत सदस्य सर्वश्री विक्रम काळे, श्रीकांत देशपांडे, नागोराव गाणार यांनी सहभाग घेतला.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे ००००
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आरोग्य कुटुंब योजना
लागू करण्याची कार्यवाही सुरु– विनोद तावडे
नागपूर, दि. 14 : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कॅशलेश कार्डाची सावित्रीबाई फुले – फातिमा शेख आरोग्य कुटुंब योजना लागू करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरु असल्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांनी सांगितले.
सदस्य कपिल पाटील यांनी शिक्षक आणि शिक्षकेत्तरांना आरोग्य कुटुंब योजना लागू करण्याबाबतचा प्रश्न विचारला होता. श्री.तावडे म्हणाले महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेप्रमाणे कॅशलेश कार्डाची सुविधा लागू करण्याबाबत शासनाची भूमिका सकारात्मक आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री श्रीकांत देशपांडे,जयवंतराव जाधव यांनी सहभाग घेतला.
००००
अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत
840 शिक्षकांचे थकित वेतन अदा– विनोद तावडे
नागपूर, दि.14 : अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या 840 शिक्षकांचे थकित वेतन अदा करण्यात आल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
सदस्य प्रा.अनिल सोले यांनी अपंग समावेशित योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या विशेष शिक्षक व परिचरांच्या थकीत वेतनाबाबतचा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला होता. श्री.तावडे म्हणाले अपंग समावेशित शिक्षण योजना ही केंद्र शासनाची योजना असून 4 ते 5 वर्षा पासूनचे वेतन दिलेले नव्हते. या योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या 1185 विशेष शिक्षक व 72 परिचरांच्या समाप्त करण्यात आलेल्या सेवा पुर्न:प्रस्थापित केल्या आहेत.
००००
येवला तालुक्यातील 41 टंचाईग्रस्त गावांसाठी
नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरु करणार– बबनराव लोणीकर
नागपूर, दि. 14 : येवला तालुक्यातील 41 टंचाईग्रस्त गावांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमामध्ये नवीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु करणार असल्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य जयवंतराव जाधव यांनी पाणीपुरवठ्याबाबतचा प्रश्न विचारला होता. श्री.लोणीकर म्हणाले नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाने अहवाल सादर केला आहे. या अहवालाची छाननी करण्याची कार्यवाही सुरु आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे ००००
नागपूर हिवाळी अधिवेशन
दि. 14 डिसेंबर, 2017
विधानसभा लक्षवेधी :
क्र. 2
रक्तातील प्लाझमा विलगीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यात
फ्रॅक्सीनेशन सेंटर सुरु करण्याचे विचाराधीन
मुंबई केईएम रुग्णालयात फ्रॅक्सीनेशन सेंटर प्रस्तावित– आरोग्यमंत्र्यांची माहिती
नागपूर, दि. 14 : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रक्तातील प्लाझमा विलगीकरणासाठी फ्रॅक्सीनेशन सेंटर सुरु करण्याचे विचाराधीन असून, मुंबई येथील केईएम रुग्णालयात फ्रॅक्सीनेशन सेंटर प्रस्तावित करण्यात आले आहे. कालबाह्यतेमुळे रक्त वाया जाण्याचे प्रमाण एकूण रक्त संकलनाच्या 1.80 टक्के एवढे आहे. रक्ताच्या विहित दरापेक्षा जास्त दर आकारणाऱ्या 72 रक्त पेढ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे विधानसभेत सांगितले.
यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात 328 परवानाधारक व नोंदणीकृत रक्तपेढ्या आहेत. त्यांच्या माध्यमातून सन 2016 मध्ये 15.70 लाख युनिट रक्त संकलित करण्यात आले होते. राज्याला 11.23 लाख युनिट रक्ताची गरज आहे. रक्त वाया जाण्याची वेगवेगळी कारणे आहेत. देशात 1.8 टक्के एकूण रक्त वाया जाण्याचे प्रमाण असून, राज्याचे हे प्रमाण देशाच्या तुलनेत कमी आहे.
परवानाधारक 328 रक्तपेढ्या यांच्या माध्यमातून रक्त संकलन केले जाते. त्यामध्ये ए-निगेटिव्ह, एबी-निगेटिव्ह आणि ओ-निगेटिव्ह या रक्त गटाचे संकलन गरजेप्रमाणे केले जाते. रक्त संकलन करणाऱ्या संस्था आणि वारंवार रक्तदान करणारे रक्तदाते यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनस्तरावर योजना सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे आरोग्य मंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील रक्तपेढ्यांना आरोग्य विभागामार्फत ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाते. मात्र त्यांना परवाना देण्याचा अधिकार अन्न व औषधे प्रशासन विभागाकडे आहे.
विहित दरापेक्षा जास्त दर आकारणाऱ्या 72 रक्तपेढ्यांवर कारवाई येत्या 3 महिन्यात करण्यात येणार असून त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला कळविण्यात येईल. रक्तातील प्लाझमा विलगीकरण करुन रक्त वाया जाऊ नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये फ्रॅक्सीनेशन सेंटर सुरु करण्याचे विचाराधीन आहे. मुंबई येथील केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीत फ्रॅक्सीनेशन सेंटर सुरु करण्याचे प्रस्तावित केले असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
राज्यात केंद्र शासनाचा क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट राज्यात लागू करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून यासंदर्भात नियोजन विभागाकडे अभिप्रायार्थ फाईल पाठविण्यात आली आहे. त्यानंतर हा कायदा लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, सुभाष साबणे, शशिकांत शिंदे, मंगलप्रभात लोढा यांनी भाग घेतला.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 000
क्र. 3
अर्भक मृत्यू रोखण्यासाठी राज्यात
6 महिन्यामध्ये सहा ठिकाणी एसएनसीयू सुरु करणार
डोंगरी भागात डॉक्टरांच्या नेमणूकीसाठी वेगळे निकष करणार
राज्यातील अर्भक मृत्यू रोखण्यासाठी राज्यात 6 महिन्यामध्ये सहा ठिकाणी एसएनसीयू सुरु करणार असून नाशिक आणि अमरावती येथे दोन एसएनसीयू तातडीने सुरु करणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले.
यासंदर्भात सदस्य अजित पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले की, केंद्र शासनाच्या एसआरएस सर्व्हेनुसार राज्याचा अर्भक मृत्यू दर हा यावर्षी दोन अंकांनी कमी होऊन 19 एवढा आहे. राज्यामध्ये सध्या 36 एसएनसीयू कार्यान्वित असून त्यामधील मृत्यूचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. हे प्रमाण 12 टक्क्यांवरुन ऑक्टोबर अखेर आठ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.
अर्भक मृत्यू रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी राज्यस्तरावर आरोग्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील नामांकित खासगी रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत निओनॅटोलॉजिस्ट तसेच स्त्रीरोग तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या शिफारशींनुसार प्रतिजैविके, कॅफिन तसेच प्रसूतीपूर्व कॉरटिकोस्टेरॉईड याबाबत प्रोटोकॉल वापरण्यात येत आहे.
राज्यात असलेल्या एसएनसीयूमधील खाटांची संख्या वाढविण्यात आली असून 380 खाटा वाढविण्यात आल्या आहेत. राज्यात डॉक्टरांची पदे भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले असून डोंगरी भागांसाठी डॉक्टरांच्या नेमणुकीकरीता वेगळे निकष लावण्यात येतील. राज्याच्या दुर्गम भागात 320 बंधपत्रीत उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री विजय वडेट्टीवार, अबु आझमी, सत्यजित पाटील, श्रीमती सीमा हिरे यांनी भाग घेतला.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 000
क्र. 1
मुंबई विद्यापीठ ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीच्या कार्यवाहीत
ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्यांच्यावर कठोर कारवाई करणार
मुंबई विद्यापीठाच्या ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीची चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यामार्फत या प्रक्रियेचा अभ्यास केला जात आहे. ज्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले.
यासंदर्भात सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. याला उत्तर देताना श्री.तावडे बोलत होते.
यावेळी झालेल्या चर्चेत उपप्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री रविंद्र वायकर म्हणाले की, या त्रिस्तरीय सदस्य समितीमार्फत करार निविदा प्रक्रिया यांचा अभ्यास केला जात आहे. या समितीसाठी तीन महिन्याची मुदत देण्यात आली असून, अहवाल प्राप्त होताच कार्यवाही करण्यात येईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अजित पवार यांनी भाग घेतला.
0000
विधानसभा प्रश्नोत्तरे :
प्र.क्र. 96360
हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी जलयुक्त शिवार योजनेच्या
कामांसाठी नवीन दरसूची तयार करणार – प्रा. राम शिंदे
नागपूर, दि. 14 : जलयुक्त शिवार योजनेसाठीच्या कामांकरिता हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी नवीन दर सूची जाहीर करण्यात येईल, असे मृद व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
राज्यात जलयुक्त शिवार योजनेच्या प्रस्तावित कामांना तीन वर्षापूर्वीची दरसूची लागू केल्याबाबत सदस्य वैभव नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना प्रा. शिंदे म्हणाले की, या योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 238 कामे प्रस्तावित असून त्यापैकी 206 कामे पूर्ण झाली आहेत, तर 32 कामे अपूर्ण आहेत. यासाठी आवश्यक तो निधी विशेष निधीच्या माध्यमातून उपलब्ध करुन वेळेत काम पूर्ण करण्याचे संबधितांना निर्देश देण्यात येतील.
या योजनेंतर्गत सन 2015-16 व 2016-17 या वर्षात 56 हजार 600 टिसीएम पाणीसाठा झाला असून 22 हजार 237 हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. कोकण विभागासाठी सन 2016-17 मध्ये 18.93 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. राज्यभरातील कामांसाठी 6 हजार 144 कोटी कर्न्व्हजन निधीतून देण्यात आले असून 3 हजार 139 कोटी रुपये विशेष निधीतून उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामध्ये 57.99 कोटी रुपये कोकणसाठी विशेष निधीतून देण्यात आले आहे.
मृद व जलसंधारण विभाग निर्माण केल्यानंतर 2013 ची दरसूची तात्पूरत्या स्वरुपात लागू केली होती. हे अधिवेशन संपण्यापूर्वी नवीन दरसूची जाहीर करण्यात येईल, असेही प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, सुरेश गोरे, हर्षवर्धन सपकाळ, शंभुराज देसाई यांनी भाग घेतला.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 000
प्र.क्र. 95859
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर व शाहू महाराज संग्रहालयाच्या
पर्यटन विकास आराखड्यास मान्यता – चंद्रकांत पाटील यांची माहिती
कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदीराचा 78 कोटी रुपयांचा पर्यटन विकास आराखडा मान्य झाला असून शाहू महाराज संग्रहालयासाठी 13 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामाध्यमातून या दोन्ही पर्यटन स्थळांचा विकास केला जाईल, असे कोल्हापूरचे पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य शशिकांत शिंदे यांनी पुणे, कोल्हापूर व यवतमाळ येथील 10 पर्यटन स्थळांचा विकास करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी एका उपप्रश्नाला उत्तर देताना श्री. पाटील बोलत होते. त्यांनी सांगितले की, महालक्ष्मी मंदीर परिसराच्या 78 कोटी रुपयांच्या पर्यटन विकास आराखड्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत त्याला लवकरच मान्यता देण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी उपप्रश्नाला उत्तर देताना पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितले की, राज्याच्या पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी प्रत्येक जिल्ह्याला पर्यटन विकास आराखडा करण्यास सांगितले आहे. त्यापैकी 23 जिल्ह्यांनी आराखडे सादर केले असून अंतिम छाननी नंतर ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. सध्या 12 जिल्ह्यांच्या पर्यटन विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून त्यामध्ये यवतमाळ येथील 18 पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 65 कोटी, पुणे जिल्ह्यातील 101 पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 237 कोटी तर कोल्हापूर जिल्ह्यातील 148 पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 246 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली आहे. राज्यातील आठ मोठ्या पर्यटन विकास आराखड्यास मान्यता देखील देण्यात आली आहे.
000
प्र.क्र. 95082
कुष्ठरुग्णांची सेवा करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात
वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय– आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत
राज्यात कुष्ठरोग शोध मोहीम 2 वर्षापासून सुरु असून त्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात 252 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर औषधोपचार करुन त्यांना रोगमुक्त करण्यात आले आहे. कुष्ठरुग्णांची सेवा करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज येथे विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
राज्यात राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग शोधमोहिमेबाबत सदस्य प्रशांत ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री बोलत होते.
राज्यातील 22 जिल्ह्यात 6 ते 21 सप्टेंबर 2017 दरम्यान कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात 659 संशयित रुग्णांची नोंदणी झाली. त्यांची तपासणी केली असता 66 जणांना कुष्ठरोग झाल्याचे आढळून आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
राज्यात ग्रामीण व उप जिल्हा रुग्णालय स्तरावर 219 कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र आहे. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात 15, रायगड 15, पालघर 12 अशी संदर्भ सेवा केंद्र आहेत.
राज्यात कुष्ठरुग्णांच्या सेवा करणाऱ्या 29 स्वयंसेवी संस्था काम करत असून त्यांच्या अनुदानात वाढ करण्याबात सकारात्मक निर्णय घेऊ. वर्धा जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिमेबरोबरच हत्ती पाय रोग शोध मोहिम हाती घेऊ, असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुनिल केदार, समीर कुणावार, संजय केळकर, मिलिंद माने यांनी भाग घेतला.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 000
प्र.क्र. 98951
रुग्णालयांच्या धडक तपासणी मोहिमेत 81 बोगस डॉक्टर आढळले
20 डॉक्टरांवर गुन्हे दाखल
राज्यभरातील सर्व रुग्णालयांच्या तपासणीची धडक मोहीम 15 मार्च ते 31 मे 2017 या कालावधीत राबविण्यात आली. त्यामध्ये 37 हजार 68 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. पैकी 6742 रुग्णालयांमध्ये कायद्यातील तरतूदीनुसार त्रुटी आढळून आल्या आहेत. या तपासणीमध्ये 81 बोगस डॉक्टर आढळून आले असून त्यापैकी 20 डॉक्टरांवर एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.
विधानसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांनी राज्यातील रुग्णालयांच्या तपासणी मोहिमेबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे की, 37 हजार 68 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 6742 रुग्णालयांमध्ये कायदेशीर त्रुटी आढळून आल्या. 2084 वैद्यकीय संस्थांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण कायद्याचे पालन न केल्याचे आढळून आले आहे. या मोहिमेत पथकाने केलेल्या तपासणीत 81 बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. त्यापैकी 20 डॉक्टरांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पथकाने तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीसमोर मांडल्या आहेत.
या मोहिमेंतर्गत 169 वैद्यकीय संस्थांना दंड करण्यात आला आहे. 27 दवाखाने बंद करण्यात आले आहेत. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 चे उल्लंघन झाल्याचे आढळून आले असून त्यामुळे चार केंद्र बंद करण्यात आले आहे. पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे पाच सोनोग्राफी मशीन सील करण्यात आल्या आहेत.
000
अजय जाधव/
राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्ग
राज्याच्या विकासात महसूल आणि रस्ते विकासाचे महत्वाचे योगदान
– चंद्रकांत पाटील
नागपूर, दि. 14 : राज्याच्या विकासात महसूल आणि रस्ते विकास यांचे योगदान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या संसदीय अभ्यास वर्गात ‘महाराष्ट्राच्या गतिशील पायाभूत विकासात सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे अमूल्य योगदान’ या विषयावर ते बोलत होते.
श्री.पाटील पुढे म्हणाले, राज्य चालविण्यासाठी कराच्या माध्यमातून महसूल गोळा केला जातो. महसूल जमा करण्याची ही पद्धत 5 हजार वर्षांपूर्वीपासून चालू आहे. कुठलेही काम करण्यासाठी सरकारची मंजूरी घ्यावी लागते. कुठलीही परवानगी देताना शासन कायद्यानुसार महसुलाची आकारणी करते. महसूल संबंधीचे कायदे शासनामार्फत करण्यात येतात. हे कायदे लोकांना जाचक वाटू नये, याचा विचार करुन लोकांना काय अडचणी येतात याबाबत विचार होऊन कायदे तयार झाले पाहिजेत. लोकांनी मागणी न करता कायदा होणे अपेक्षित आहे असे त्यांनी सांगितले. महसूल यंत्रणेतील प्रत्येक घटकाचा नागरिकांच्या दैनंदिन कामकाजात संबंध येतो. शासनाच्या योजनांची माहिती,लागणारे विविध दाखले, महसूल यंत्रणेमार्फत दिले जातात. जनतेला विविध योजनांची माहिती, दाखले एकाच ठिकाणी मिळावे यासाठी ‘महाराजस्व अभियान’ महसुल यंत्रणेमार्फत राबविण्यात आले. सातबारा ऑन लाईन देण्यात येत आहे.
राज्याच्या विकासात रस्त्यांचे योगदान महत्वाचे आहे, यादृष्टीने शेताकडे जाणारे लहान रस्ते, मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत येणारे रस्ते, ग्रामीण रस्ते, जिल्हा रस्ते, राष्ट्रीय महामार्ग या माध्यमातून राज्यात रस्ते विकसित करण्यात येतात. राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्र शासनाकडूनही निधी उपलब्ध होत आहे. तसेच रस्ते सुस्थितीत राहण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत असते.
विविध प्रकल्प निर्माण करताना या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करणे तसेच आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकरी, नागरिकांना मदत करणे हे ही शासनाचे काम असून ते आपत्ती मदत व पुनर्वसन विभागामार्फत करण्यात येते. विविध विभागामार्फत शासकीय योजना राबविण्यात येत आहेत. सर्वच विभागाचे राज्याच्या विकासात योगदान महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधान मंडळाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांनी श्री.चंद्रकांत पाटील यांचा परिचय करुन दिला.
००००
विष्णू काकडे/वि.सं.अ./14.12.17
राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्ग
विधीमंडळाच्या समित्या शासन, प्रशासनावर
नियंत्रण ठेवण्याचे काम करतात
नागपूर, दि. 14 : शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणारे प्रकल्प त्यासाठी होणार खर्च तसेच विविध समाज घटकांचे हक्क यांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी विधीमंडळाच्या विविध समित्या शासन, प्रशासन यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत असतात, असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या संसदीय अभ्यास वर्गात ‘विधीमंडळाची समिती पद्धती व अर्थविषयक समित्यांचे कामकाज’ या विषयावर ते बोलत होते.
श्री. रावते पुढे म्हणाले की, विधीमंडळाच्या प्रत्येक समितीचे कार्यक्षेत्र वेगळे असते. विधीमंडळाच्या चिकित्सा समितीकडे विधीमंडळातील वादातील विधेयके पाठविली जातात. या विधेयकामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार या समितीला असतो. सर्वपक्षीय सदस्य या समितीमध्ये असल्याने त्यांनी सुधारणा केलेले विधेयक विधीमंडळात मंजूर करण्यात येते. कायदा केल्यानंतर त्याची छाननी करुन लोकांना जाचक असणाऱ्या अटी कमी करुन कायद्याची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी उप विधान समिती काम करत असते. अंदाज समिती अर्थसंकल्पातील मंजूर असलेल्या बाबींची अंमलबजावणी होते की नाही ते पाहते तर लेखा समिती अर्थसंकल्पातील कार्यपद्धतीवर अंकुश ठेवते. सार्वजनिक उपक्रम समिती ही राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कायद्याबाबतचे काम करते. या समितीचा विविध कारणाने लोकांशी थेट संपर्क येतो. पंचायत राज समिती जिल्हा पातळीवरील जिल्हा निधीतून करण्यात येणाऱ्या विकास कामांवर लक्ष ठेवते. ते योग्य प्रकारे होते किंवा नाही हे पाहते. ग्रामविकासात या समितीचे महत्वाचे योगदान आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग यासाठी असलेल्या कल्याण समित्या संबंधित घटकांसाठी उपलब्ध निधी संबंधित घटकांपर्यंत पोहोचतो की नाही यावर लक्ष ठेवतात.
विधीमंडळाच्या सर्व समित्या या अत्यंत महत्वाच्या असून या समित्यांमार्फत देण्यात आलेले निर्णय,शिफारशी या सरकारला बंधनकारक असतात. योजना, प्रकल्प यांची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी नागरीक तसेच संबंधीत भागातील लोकप्रतिनिधींनी जागरुक राहिले पाहिजे, असेही श्री.रावते यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी श्री.रावते यांचा परिचय आमदार राजेश क्षीरसागर यांनी करुन दिला.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर









