👁 6 Views

जलशुध्दीकरण केंद्रातील 22 लाख लिटर क्षमतेच्या टाकीची स्वच्छता ! नागरिकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दक्षता – सभापती विक्रम शिरसट

पंढरपूर Live 14 December 2017
जलशुध्दीकरण केंद्रातील 22 लाख लिटर क्षमतेच्या टाकीची स्वच्छता !
  नागरिकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दक्षता – सभापती विक्रम शिरसट 
पंढरपूर शहरातील नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या हेतून नगर पालीका पाणी पुरवठा विभागाकडून दक्षता घेतली जात असून जलशुध्दीकरण केंद्रातील 27 लाख लिटर क्षमतेचा सेटलिंग टँक व 22 लाख लिटर मुख्य पाण्याची टाकीची संपुर्ण स्वच्छता केली आहे.पाणी पुरवठा समितीचे सभापती विक्रम शिरसट यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी सर्व तांत्रीकबाबींची पुर्तता करीत ही स्वच्छता मोहीम राबवीली आहे.या वेळी जलशुध्दीकरण केंद्राचे अशोक भालेराव यांनी या कामाची उपस्थितांना माहीती दिली.
         या बाबत अधिक माहीती देताना सभापती विक्रम शिरसट म्हणाले की,पंढरपूर शहरातील नागरिकांना शुध्द पिण्याचा पाणी पुरवठा व्हावा यासाठी येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या माध्यामतून विशेष दक्षता घेतली जाते.या ठिकाणी जलशुध्दीकरणासाठी असलेल्या सेटलिंग टँक बरोबरच मुख्य साठवण टाकीची वेळोवेळी स्वच्छता करणे गरजेचे असते.स्वच्छतेच्या सर्वत्या उपायोजना करण्यासाठी याठिकाणी आपण वारंवार भेट घेवून माहीती घेतो.या टाक्यांची स्वच्छता करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने एक कालबध्द उपाययोजना केली असून त्यानुसार हे स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले होते.नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून वापरून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी विक्रम शिरसट यांनी केले आहे.
              यावेळी  शिक्षण समितीचे सभापती संजय निंबाळकर,नगरसेवक नारायण शिंगण,समाजसेवक सचिन शिंदे,अमोल डोके,शंकर देवमारे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी या   स्वच्छता मोहीमेसाठी विशेष परिश्रम घेतलेल्या कर्मचार्‍यांचेही अभिनंदन करण्यात आले.






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *