पंढरपूर Live 14 December 2017
सेालापूर 14 :- लघु उद्योगांना प्रोत्सान देण्यासाठी जिल्हास्तरावर उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योगांना पुरस्कार देण्यात येतो. सन 2017 साठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील सुक्ष्म व लघु उद्योजकांनी आपले प्रस्ताव दिनांक 30 डिसेंबर 2017 पर्यंत सादर करावेत.
जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचा रूपये 15000 व व्दितीय क्रमांक पुरस्कार 10,000 रूपये , शाल व श्रीफळ असा असून पुरस्कारासाठी अर्जाच्या वेळी, उद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी या कार्यालयाकडे ईएम भाग – 2 अथवा उद्योग आधार अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे व कमीत कमी मागील सतत दोन वर्षापासून उत्पादन सुरू असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी (थकबाकीदर असू नये). उद्योग घटकास यापुर्वी कोणताही ( जिल्हा / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय) स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने, विहित केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे.
पुरस्कारासाठी जिल्ह्यातील सुक्ष्म व लघु उद्योजकांनी विहित नमुन्यात अर्ज करावेत. अधिक माहिती साठी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, बी.टी.यशवंते यांनी केले आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर








