पंढरपूर Live 17 December 2017
निलेश चाळक बीड : सरकारकडून कर्जमाफीचा गवगवा केला जात असताना जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. शनिवारी तालुक्यातील डोकेवाडा येथे एका अल्पभूधारक शेतकऱ्यानं घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुरली निवृत्ती घरत (३० रा. डोकेवाडा) असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे. अल्पभूधारक असलेले घरत कुटुंबीय शेतीत भागत नसल्याने ऊसतोडणी करुन उदरनिर्वाह भागवते. मुरली वडिलांसोबत ऊसतोडीसाठी बाहेरगावी गेले होते. आठ दिवसांपूर्वी ते गावी परतले. त्यांच्याजागी त्यांचा भाऊ ऊस तोडायला गेला होता. दरम्यान, शेती व घरखर्चासाठी मुरली यांनी जिल्हा बँक व मराठवाडा बँकेकडून प्रत्येकी १ लाख असे दोन लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जमाफीच्या यादीत त्यांचे नावही आले होते; पण प्रत्यक्ष लाभ अद्याप झाला नव्हता. इतर लोकांचे उसणवारी घेतलेले पैसे फेडण्याची चिंताही त्यांना होती. यातून शनिवारी सायंकाळी सहा वाजता जनावरांच्या गोठ्यातील आडूला त्यांनी दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई- वडील, दोन भाऊ, पत्नी व सहा महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी त्यांना फासावरुन खाली उतरवत जिल्हा रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी नेकनूर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







