👁 8 Views

बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कपाशीचे पंचनामे सुरू


पंढरपूर Live 17 December 2017
बीड : बोंडअळी व तुडतुड्यामुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात पंचनामे करण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी शासनस्तरावर काढण्यात आले होते.त्याची अंमलबजावणी करीत बीड तालुका कृषी कार्यालय व तहसील प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. 
गेल्या दोन महिन्यापासून खरीपातील कापूस अंतिम टप्प्यात असताना कपाशीने या पिकाला घेरले आहे. उत्पादनावर झालेला खर्च व हातातोंडशी आलेले पिक वाया जात असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत होता. विविध संघटना, शेतकरी व विरोधी पक्षाच्या वतीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत होती. त्यानुसार नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे कररण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले असून बीड तालुक्यात त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत आहे. गुरूवारी तालुका कृषी कार्यालय व महसूलच्या वतीने तालुक्यातील कामखेडा येथील मोहम्मद शेख यांच्या शेतातील कपाशीची पाहणी केली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी आत्माराम वाव्हळ, हनुमंत काळे, तलाठी श्रीमती शीतल चाटे, कृषी सहायक बुद्धभूषण मानेश्वर यांच्या अधिकारी उपस्थित होते.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *