👁 6 Views

संत केदारी महाराज सप्ताह उत्साहात सुरु


पंढरपूर Live 17 December 2017
हाकार्‍या माळावर भाविकांची मांदियाळी;मंगळवारी सप्ताहाची सांगता 
परळी/प्रतिनिधी
 परळी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वैजवाडी येथे  संत कदारी महाराज यांच्या पदस्पर्षाने पवित्र झालेल्या हाकार्‍या-पुकार्‍या माळावर अखंड हरिनाम सप्ताह मंगळवार दि.१२ डिसेंबर पासुन मोठ्या उत्साहात सुरु करण्यात आला आहे. आजपर्यंतच्या सप्ताहात महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार,प्रवर्तनकार व भजन व गायन यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले असुन भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.मोठ्या उत्साहात सुरु असलेल्या सप्ताहाची सांगता मंगळवार दि.१९ रोजी ह.भ.प. विश्‍वंभर महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान ह.भ.प.उत्तममहाराज उखळीकर व संत केदारी महाराज युवा मित्र मंडळ व समस्त गावकर्‍यांनी केले आहे. 
मागील मंगळवार दि १२ डिसेंबर पासुन वैजवाडीयेथील हाकार्‍या-पुकार्‍या माळावर संत केदारी महाराज यांच्या पावन भुमित अखंड हरिणाम सप्ताहाचे अयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहात आज पर्यंत ह.भ.प.लिंबाजी महारज तिडके,ह.भ.प.भरत महाराज जोगी,ह.भ.प.ज्ञानेाबा माऊली लटपटे कोद्रीकर,ह.भ.प.भागवत महाराज शिंदे,ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर, या प्रसिद्ध किर्तनकारांनी किर्तनसेवा सादर केली तर आज रविवार दि.१७ रोजी ह.भ.प.प्रसाद महाराज रोहीणीकर तर उद्या सोमवार दि.१८ रोजी ह.भ.प.विठ्ठलमहाराज उखळीकर यांचे किर्तन अयोजीत करण्यात आले आहे. तर मंगळवार दि.१९ डिसेंबर रोजी ह.भ.प. विश्‍वंभर महाराज उखळीकर यांचे पहाटे ५ ते ७ काल्याचे किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.तरी पचक्रोशीतील भाविकांनी कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान ह.भ.प.उत्तममहाराज उखळीकर,ह.भ.प.केशवमहाराज उखळीकर,ह.भ.प.विठ्ठल महाराज उखळीकर,ह.भ.प. विश्‍वंभर महाराज उखळीकर,दिनानाथ महाराज उखळीकर आदिंनी केले आहे.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *