👁 11 Views

कलम 37 (3) नुसार मनाई आदेश लागू

पंढरपूर Live 21 December 2017
कलम 37 (3) नुसार
मनाई आदेश लागू
सोलापूर दि.21 :- पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिनांक  21 डिसेंबर 2017 ते 4 जानेवारी 2018या कालावधीत मोठया प्रमाणात सभा घेणे व मिरवणूका काढल्या जाण्याची शक्यता आहे. या कालावधीत सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस उपआयुक्त पोर्णिमा चौगुले-श्रींगी यानी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 मधील 37 (3) नुसार दिनांक  21 डिसेंबर 2017 ते 4 जानेवारी 2018 कालावधीत मिरवणूका काढणेस, सभा घेणेस, 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येणेस मनाई आदेश जारी केला आहे. हा आदेश लग्न समारंभ, अंतयात्रा, मिरवणूका, मोर्चे, रॅली, आंदोलने, निवेदने धरणे, सभा इत्यादीना सक्षम पोलीस प्राधिकाऱ्याची परवानगी असल्यास लागू राहणार नाही



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

आयुक्तालय हद्दीत
37 (1) आदेश लागू
सोलापूर दि. 21 :- सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी पोलीस उपआयुक्त पोर्णिमा चौगुले –  श्रींगी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

 आदेश दिनांक 21 डिसेंबर 2017 ते 4 जानेवारी 2018 या कालावधीसाठी लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार शस्त्रे, तलवारी, भाले सुरे, बंदुका, काठ्या, किंवा झेंडा असलेली किंवा इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. कोणतीही ज्वालागृही अगर स्फोटक पदार्थ वाहुन नेणे. दगड अगर तत्सम शस्त्रे साठविणे अगर बाळगणे. व्यक्ती अगर प्रेत अगर त्यांचे प्रतिमा याचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी  म्हणणे, वाद्य वाजविणे, असभ्य हावभाव करणे, असभ्य भाषा वापरणे सभ्यता अगर  नितिविरुध्द निरनिराळया जमातीच्या भावना दुखावल्या जातील व त्यामुळे त्यांच्यात भांडणे, बखेडे निर्माण होवुन अशी सोंगे अगर चिन्ह अगर दस्तऐवज अगर जिन्नस तयार करुन त्याचा प्रचारासाठी उपयोग करण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकीय नोकरांना त्यांचे कर्तव्य व अधिकार बजावण्यासाठी उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्यांनी  सक्षम पोलीस प्राधिकरणाची परवानगी  घेतली आहे, अशा व्यक्तींना परवानगीतील अटीस पात्र राहून सदरचे आदेश लागू होणार नाहीत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *