👁 9 Views

राज्य वाङमय पुरस्कारासाठी 31 जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठवाव्यात

पंढरपूर Live 21 December 2017
राज्य वाङमय पुरस्कारासाठी
31 जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठवाव्यात
सोलापूर दि. 21:-  राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या  स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठी दिनांक 31 जानेवारी 2018 पर्यंत इच्छुकांनी प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्वसाधारण शाखेत तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
                दिनांक 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके पुरस्कारासाठी पात्र आहेत. प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर/पाकीटावर ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कार 2017 साठी प्रवेशिका’ असा उल्लेख करावा.
                पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटय मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी मुंबई येथे आणि मुंबई वगळता अन्यत्र संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्व साधारण शाखा अथवा करमणुक शाखा )‍  संपर्क साधावा.  किंवाwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावार ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2017 नियमावली व प्रवेशिका या शिर्षाखाली व ‘What’s new या सदरात‘Late Yashwantrao Chavan State Literature Award 2017 Rules Book and Application From’ या शिर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्याhttp://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. या ठिकाणी प्रवेशिका विनामूल्य उपलब्ध होतील. 
                लेखक / प्रकाशक प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबईतील लेखक /प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतीसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव,महाराष्ट्र राज्य,साहित्य आणि संस्कृती मंडळ, येथे व  मुंबई वगळता अन्य्‍ा ‍ठिकाणच्या लेखक /प्रकाशकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विहित मुदतीत प्रवेशिका दाखल कराव्यात असे, तहसिलदार उज्वला सोरटे यांनी कळविले आहे.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *