👁 9 Views

200 कोटीच्या धुराळ्यावर नगराध्यक्षांचे सडेतोड उत्तर..!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 
===================
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
======================

200 कोटीच्या धुराळ्यावर नगराध्यक्षांचे सडेतोड उत्तर..!

पंढरपूर Live 23 December 2017
पंढरपूर शहर हे भारताची दक्षिण काशी समजली जाते. शहरामध्ये
भरणा-या चार मोठ्या यात्रा, अधिक मास व दरमहिना होणारी एकादशी
व दररोज येणारे भाविक यांची संख्या कोट्यावधी असल्याने शासनाने
पंढरपूर ,देहु, आळंदी, भंडाराडोंगर या तिर्थक्षेत्रासाठी विकास आराखडा
तयार करुन मोठया प्रमाणात निधी मंजुर केला. व यामध्ये पंढरपूर साठी
सन २००८-२००९ पहिल्या टप्यात १८५ कोटीचा आराखडा मंजूर
करण्यात आला होता. पंढरपूर शहरामध्ये येणा-या भाविकांसाठी चांगल्या
सेवासुविधा देण्यासाठी हा आराखडा मंजुर करण्यात आला होता. सन
२०११-२०१२ पासून या १८५ कोटी मध्ये शहरासाठी प्रस्तावित केलेली
कामे राज्य शासनाच्या विविध खात्यामार्फत करण्यात आली आहेत. परंतू
शहरातील काही राजकिय सामाजिक संघटना व काही स्वयंघोषित
सामाजीक कार्यकर्ते हे वैयक्तीक आकसापोटी व स्वार्थी हेतूने व राजकिय
दृष्टया प्रसिद्धीसाठी सोशल मिडिया द्वारे नगरपरिषदेला लक्ष करित
आहेत. व जाणीवपुर्वक बदनाम करण्याचा घाट या मंडळीनी घातला आहे.
म्हणून पंढरपूर शहरातील राज्य शासनाने विविध खात्यामार्फत केलेल्या
१८५ कोटीच्या विविध विकास कामाबाबत नागरिकांमध्ये झालेला
गैरसमज दुर करण्यासाठी व खरी वस्तूस्थिती नागरीकांसमोर येणे गरजेचे
असल्याने खालीलप्रमाणे खुलासा करण्यात येत आहे.


1) सावकर पुतळा ते इंदिरा गांधी चौक , डॉ.बाबासाहेब आंबेडकर
चौक ते रक्तपेढी ,छ. शिवाजी चौक ते विवेकवर्धनिय विद्यालय
रस्ता दुभाजकासह डांबरीकरण रक्कम रुपय १०.९० कोटी
2) प्रदक्षणा मार्ग व छ.शिवाजी चौक महाद्वार रस्ता दुरुस्ती व
डांबरीकरण रक्कम रुपये १० कोटी
3) शहरातील विविध ठिकाणी भाविकांच्या सोईसाठी सुलभ इंटर
नॅशनल तर्फे बांधण्यात आलेली भव्यदिव्य सुलभ शौचालय
र.रु.७१.६१ कोटी
4) प्रदक्षणा रस्त्याला जोडणारी सर्व लहान रस्ते(बोळ) पेव्हिंग ब्लॉक
र.रु..२.१० कोटी
5) गजानन महाराज मठामागे पार्किंग विकसीत करणे र.रु.३.३३
कोटी
6) खाजगी मठ /वाडी यांना स्वच्छतागृह बांधण्याकरिता अनुदान
र.रु.१० कोटी
7) अस्थित्वातील सर्व सार्वजनिक स्वच्छातागृह व मुता-या दुरुस्ती
करणे र.रु. ६.९२ कोटी
8) बंधारा बांधणे व विष्णपत परिसर सुधारणा र.रु.२०कोटी
9) नदी काठी घाट विकसीत करणे र.रु.२५ कोटी
10) प्रवासी स्वागत केंद्र व क्लॉक रुम बांधनी १.३० कोटी
11) घनकचरा व्यवस्थापनासाठी मोबाईल टॅायलेट कंटेनर,
नालाडिच मशिन, डंपर प्लेसर वैगेर साहित्य पुरवठा करणे
र.रु.४.१०कोटी


12) चंद्रभागा नदीवरील सोलापूर रस्ता जोडणारा पुल र.रु.२०
कोटी
13) ६५ एकर जागेवर भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी
व्यवस्था करणे र.रु.४.५६ कोटी
14) नवीन काम – म. फुले चौक ते गोपाळपुर चोक रस्ता रुंदीकरण
व मजबुतीकरण ते सांगोला चौक रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण
,नवीन काम- ग. महाराज मठ ते भक्ती मार्ग चौक रस्ता करणे
(युटीलीटीसह ) र.रु. २४ कोटी
15) 65 एकर जागेत शौचालय बांधणे (स्थापत्य व विद्युतीकरण)
र.रु.५.४७ कोटी
16) वाळवंट सुधारणा – नदीकाठी घाट विकसीत करणे
17) पंढरपूर नगरपालिका हद्दीतील ६५ एकर मधील अंतर्गत
रस्त्याची सुधारणा र.रु.९३लाख
18) पंढरपूर येथील नवीन पालखतळ शेगाव दुमाला रस्ता दुतर्फा
वृक्ष लागवड र.रु.२३ लाख
वरील सर्व कामे नगरपरिषदे मार्फत न करता शासनाने
मा.विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली
सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्रधिकरण व
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व इतर राज्य शासनाने
नेमलेल्या अखत्यारित असलेल्या शासकिय विभागामार्फत केलेली
आहे. आणि शासनाने वरील कामासाठी १८५ कोटीचा निधी त्या
त्या विभागाकडे वर्ग केलेल्या रक्कमेतून करण्यात आलेली आहेत.
सदर चा निधी नगरपरिषदेकडे निधी वर्ग होऊ नये व ही कामे
नगपरिषदे मार्फत होऊ नयेत म्हणुन जाणीव पुर्वक प्रयत्न करण्यात


आले तसेच या विकास आराखड्या मध्ये शहरातील महत्वाचे १६
रस्ते प्रस्तावित असताना फक्त ६ रत्या साठी निधी मंजुर करण्यात
आला राहीलेल्या रस्ता साठी अद्याप निधी मंजुर करण्यात आला
नाही सन २०११ रोजी हा निधी व कामे मंजुर असताना सुद्धा
त्या काळात कामे पुर्ण होऊ शकली नाही, मात्र तात्कालीन.जिल्हा
अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विशेष प्रयत्नातुन या कामाला गती
मिळु ही कामे पुर्ण झाली.तसेच सार्वजनिक बाधंकाम
विभागामार्फत चालु असलेल्या साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे ,
मध्य प्रदेश भवन ते गोपाळपुर या रस्ताचे काम चालु असताना
काही शेतक-यानी जागेचा कब्जा देण्यास विरोध केला होता
त्यावर आमदार प्रशांतराव परिचारक यांनी समक्ष जागेवर जाऊन
संबधित शेतक-याशी चर्चा करुण सदरची जागा रस्ता साठी देण्या
बाबत विनंती केल्या नंतर सदर शेतक-यानी आमदार प्रशांत
परिचारक यांचा शब्दाला मान देऊ सदरची जागा घेण्यास
मान्यता दिली. अशी वस्तूस्थिती असताना सुद्धा नगरपरिषदेला
बदनाम करण्याच्या हेतूने जाणीव पुर्वक प्रयत्न करित आहेत. जी
कामे नगरपरिषदेने केलेलीच नाहीत. सदर संघटनांना व
स्वयंघोषित सामाजीक कार्यकर्त्याना सदरची कामे निकृष्ट दर्जाची
आहेत असे वाटले असेल तर ज्यावेळीस कामे चालू होती व
ज्यांच्या काळात चालू होती त्यावेळीसच तक्रारी करणे गरजेचे
होते. सध्या १८५ कोटीची कामे झाली नाहीत १८५ कोटी कोठे
खर्च केले असा प्रश्न उपस्थित केला जातो वरील १८५ कोटी
कामाची यादी पाहिल्यानंतर राज्य शासनाने पंढरपूर साठी मोठ्या
प्रमाणात निधी उपलब्ध करुन देऊन शहराच्या विकासासाठी
मोलाचे सहकार्य राज्य शासनाने केले आहे. सध्या शहरात धुळी
बाबत चर्चा केली जाते परंतू वस्तूस्थिती समजुन न घेता केवळ


चर्चा केली जाते यांचे उत्तम उदाहरण म्हणजे पर्यटक निवास ते
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौक ते मध्यप्रदेश भवन, गोपाळपुर
रोड हि कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चालू आहेत.
सदर कामे लवकरात लवकर व्हावीत म्हणून नगरपरिषदेमार्फत
वेळोवेळी पाठपूरवा करुन कामे लवकर होणेसाठी प्रयत्न केला
जातोय. असे असताना सुध्दा सदरचे कामाबाबत नगरपरिषदेस
विनाकारण जबाबदार धरले जात आहे. नागरिकांना धुळीचा
त्रास होऊ नये म्हणून सदर कामाबाबत नगरपरिषदेचा संबध
नसताना सुध्दा नगरपरिषदेद्वारे पाण्याच्या टॅकर द्वारे पाणी मारुन
धुळ कमी करण्याचा प्रयत्न करित आहे. त्यामुळे शहरातील
नागरिकाने वरील वस्तुस्थिती लक्षात घेऊन राजकिय व
सामाजीक संघटनाच्या अपप्रचाराला बळी पडु नये व शहराच्या
विकासासाठी सहकार्य करावे असे आव्हान नगराध्यक्ष या नात्याने
करित आहे.

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *