👁 7 Views

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये दूध प्रश्‍नाबाबत आमदार श्री भारत भालके झाले आक्रमक

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 
===================
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
======================

पंढरपूर Live 23 December 2017
पंढरपूर ः दि.23 – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना सरकारने तातडीने या व्यवसायात असणार्‍या शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विधीमंडळात तारांकित प्रश्‍न उपस्थित करून सोलापूर जिल्हा दुध संघाने निपटारा चार्जेसच्या नांवाखाली शेतकर्‍यांची कशी ङ्गसवणूक केली व सोलापूर दुध उत्पादक संघाने गरीब कष्टकर्‍यांचा तोंडचा घास हिरावून घेतला व स्वतःचे उखळ पांढरे करून दुध उत्पादक गरिब शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याच्या या प्रकरणाला आमदार श्री भारत भालके यांनी विधी मंडळ सभागृहात वाचा ङ्गोडून सरकारला चांगलेच धारेवर धरले. 
यावर दुग्ध विकास मंत्री मा.ना.श्री महादेव जानकर यांनी सोलापूर जिल्हा दुध उत्पादक संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या निपटारा चार्जेच्या नांवाखाली घोटाळा केल्याचे व शेतकर्‍यांची आर्थिक ङ्गसवणूक झाल्याचे मान्य करून यामध्ये सोलापूर जिल्हा दुध उत्पादक संस्था दोषी असून त्यांचेवर कायदेशिर तरतुदीनुसार कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच सोलापूर जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकर्‍यांना निपटारा चार्जेस (कपात करण्यात आलेले पैसे) त्वरीत देण्यात येणार आहेत असे आदेश संबंधित सोलापूर जिल्हा दुध उत्पादक संस्था यांना देण्यात येईल असे आश्‍वासन दिले. तसेच राज्यातील दुध व्यवसायामधील अनेक मागण्या व इतरही समस्यांबाबत मुंबई मंत्रालय येथे संबंधित मंत्री व अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांचे समवेत एक बैठक आयोजित करून उपरोक्त विषयाबाबत सकारात्मक निर्णय घेऊन दुध उत्पादक शेतकर्‍यांना मदत करण्याचे आश्‍वासनही मा.ना.श्री जानकर साहेब यांनी आमदार श्री भारत भालके यांच्या विधानसभेत प्रश्‍नोत्तरांच्या तासात सांगितले.
त्यामुळे महाराष्ट्र राज्यातून सर्व दुध उत्पादक शेतकर्‍यांना या सोलापूर जिल्हा दुध उत्पादक संस्था यांच्या प्रश्‍नाच्या निमित्ताने न्याय मिळणेबाबत आशा लागली असून त्यामुळे राज्यातून आमदार श्री भारत भालके यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांनी राज्यातील एका प्रमुख प्रश्‍नाला विधी मंडळात वाचा ङ्गोडून महाराष्ट्र शासनाला चांगलेच धारेवर धरले होते याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *