पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2018
राज्यात 2 कोटी एलईडी बल्बचे वितरण, तर 1123 कोटी रु. बचत
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – ऊर्जा बचतीसाठी एलईडी बल्ब हा एक पर्याय आहे, केंद्र शासनाने यासाठी धोरण आखले आहे. आजपर्यंत देशात 28 कोटीहून अधिक एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले आहे, महाराष्ट्रात 2 कोटीहून अधिक बल्बचे वितरण करण्यात आले. त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रात 30 लाख 11 हजार एलईडी बल्बचे वितरण झाले आहे. केंद्र शासनाने देशात ऊर्जा बचतीच्या उद्देशाने एलईडी बल्ब वापरास प्रोत्साहन देण्यासाठी ‘उजाला’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत एलईडी बल्ब वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वितरण केंद्र उघडण्यात आली आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 2 कोटी 16 लाख 21 हजार 382 इतक्या एलईडी बल्ब चे वितरण करण्यात आले आहे. तर 92 हजार 769 एलईडी ट्यूब लाईट चे वितरण करण्यात आले आहे. एलईडी बल्ब मुळे दरवर्षी राज्याची 28 लाख मेगावॅट वीज बचत होणार आहे तर 1123 कोटी रुपयांची बचतही या मुळे होणार आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com


