👁 9 Views

गणेश नगर येथील पाण्याच्या टाकीचे पाईप बदलणार… मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची माहिती

 गणेश नगर पाण्याच्या टाकी पहाणी करताना नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, पाणी पुरवठा अभियंता आत्माराम जाधव , नगराध्यक्ष साधनाताई भोसले, नगरसेवक विवेक अमरनाथ परदेशी

पंढरपूर LIVE 8 जानेवारी 2018

 गणेश नगर येथील पाण्याच्या टाकीचे पाईप बदलणार… मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची माहिती
पंढरपूर शहरातील गणेश नगर/गजानन नगर भागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून गणेश नगर येथे पाण्याची टाकी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आली आहे. परंतु काम करत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी सदर पाण्याच्या टाकीची पाईप डि.आए.  न वापरता  सि.आए. वापरली. सदर पाईप टाकून दहा वर्षेच झाली पाईप गंजलेली आहे.
   सदर कामाची पाहणी या भागातील नगरसेवक विवेक अमरनाथ परदेशी यांनी केली , तिन महिन्या पुर्वीच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, पाणी पुरवठा अभियंता आत्माराम जाधव व नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांच्या निर्दशनात आणली व त्यांच्या समवेत गणेश नगर पाण्याच्या टाकीस भेट दिली होती. मुख्याधिकारी यांनी संबंधित अधिकारींना सदरची पाईप दुरुस्त करण्याची सुचना दिली व ते लवकरच काम पुर्ण होत आहे , असे असताना या भागातील काही राजकीय विरोधक याचे भांडवल करून व्यक्तिगत राजकीय स्वारर्था साठी पाण्याची पाईप बदलण्याचे निवेदन दिले व या बाबत नगरपरिषदेचे व नगरसेवकाचे दुर्लक्ष असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करत आहे . वास्तविक हे काम लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याने केवळ आमच्या निवेदनामुळे हे काम लवकरच पूर्ण झाले असे दाखवण्यासाठीच सदरचा प्रकार चालू आहे. त्यामुळे नागरिकांना अशा खोट्या, फसव्या बातम्या कडे दुर्लक्ष करावे. सदरचे काम नगरपरिषदे मार्फद लवकरच पूर्ण होणार असल्याचे या भागातील नगरसेवक विवेक अमरनाथ परदेशी यांनी सांगितले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *