👁 8 Views

बीडच्या तरुणाला अंबडजवळ रस्त्यावर जाळले बीड, जालन्यात खळबळ; हत्येचं कारण गुलदस्त्यात

पंढरपूर LIVE 8 जानेवारी 2018

बीडच्या तरुणाला अंबडजवळ रस्त्यावर जाळले बीड, जालन्यात खळबळ; हत्येचं कारण गुलदस्त्यात
निलेश चाळक बीड -:
अंबड रोडवरच्या कुरण फाट्यावर रविवारच्या मध्यरात्री अज्ञातांनी एका २७ वर्षाच्या तरुणाचे हातपाय बांधून त्याची निर्घृण हत्या करत रस्त्यावरच जाळून टाकल्याची खळबळजनक घटना घडली. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मिळून आलेल्या आधार कार्डावरून मृताची ओळख पटली. सदरचा तरुण हा बीड शहरापासून जवळ असलेल्या समनापूर येथील अनंता श्रीकांत इंगोले असल्याचे उघड झाल्याने बीड जिल्ह्यातही या घटनेने खळबळ उडवून दिली. अनंताची हत्या नेमकी कशामुळे झाली? त्या हत्येमागचं कारण काय? याचा शोध पोलिस घेत असून रिपोर्टरने जालन्याचे डीवायएसपी नवनाथ सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असून धुमाळ नावाच्या व्यक्तीचे एसएमएस मिळून आल्याचे सांगितले. घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह शहागड येथे पाठवला आहे.
 बीडपासून काही अंतरावर असलेल्या समनापूर येथील अनंता श्रीकांत इंगोले या २७ वर्षीय तरुणाचा इंटरनेट कॅफेचा व्यवसाय होता. बीडमध्ये तो हा व्यवसाय करायचा. गेल्या काही दिवसांपासून तो आधार कार्डाचे कामही करत होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तो घराबाहेर असल्याचे सांगण्यात येते. रविवारच्या रात्री एक ते अडीच वाजण्याच्या सुमारास अंंबड रोडवरील कुरण फाट्याजवळील भररस्त्यावर मानवी मृतदेह जळत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना भ्रमणध्वनीवरून देण्यात आली. त्यावेळी गोंदी पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता दूरध्वनीवरून आलेली माहिती सत्य असल्याचे उघड झाले. घटना एवढी भयानक होती की, मारेकर्‍यांनी अनंता इंगोले याचे हातपाय बांधले होते, त्याची हत्या करून भर रस्त्यावर इंगोलेचा मृतदेह जाळण्यात आला होता. पोलिसांनी त्याठिकाणी पंचनामा करत ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता आधार कार्डावरून अनंताची ओळख पटली. घटनेची माहिती अनंताच्या नातेवाईकांना आज पहाटे देण्यात आली. नातेवाईकांनी घटनास्थळ आणि गोंदी पोलिस स्टेशन गाठून अनंता बाबत अधिक माहिती पोलिसांना दिली, परंतु अनंताची हत्या कोणी आणि कशासाठी केली? हे मात्र अद्याप समजू शकले नाही. गोंदी पोलिस वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत. 
गोंदी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रतिनीधीने डीवायएसपी नवनाथ सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता घटना गंभीर असल्याचे सांगून तपास सुरू आहे, असं म्हणत धुमाळ नावाच्या व्यक्तीचे मॅसेज आले होते. त्या दिशेने पोलिस तपास करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेने अंबड तालुक्यासह बीड जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी औरंगाबादहून बीडकडेयेत असताना रात्री बारा वाजता मित्र नवनाथ चव्हाण याने त्याला कॉल केला होता, तेव्हा पाचोडजळ आम्ही धाब्यार जेवत आहोत, माझ्या जिवाला धोका आहे, असे त्याने नवनाथला म्हटल्याचे सांगितले जाते. अनंताने घटना घडण्यापूर्वी पुणे येथे इंजिनिअर असलेल्या गोविंद इंगोले या मोठ्या भावास एसएमएस केला होता. यात धुमाळ व अन्य एक जण माझ्या सोबत आहेत आणि २१ लाख रुपये मला येणे आहे, असे एसएमएसमध्ये नमूद केले होते. या दिशेने तपास सुरू आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *