पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2018
पंढरपूर: प्रतिनिधी
पत्रकार दिनाचे औचित्य साधून इंडीयन मेडिकल असोसिएशन पंढरपूरच्यावतीने रविवार ( दि. 7 जानेवारी ) रोजी पंढरपूर येथील सर्वच पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
येथील आय.एम.ए. हॉलमध्ये या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील सर्वच पत्रकारांची हिमोग्लोबीन, शुगर, लिपीड प्रोफाईल, कॅल्शीयम, हाडातील ठिसुळपणा, ब्लड प्रेशर, ई.सी.जी आदी सर्व महत्वाच्या तपासणी करण्यात आल्या. तसेच पत्रकारांना हेल्थ कार्ड देण्यात आले.
यावेळी प्रारंभी श्रमीक पत्रकार संघाच्यावतीने जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे यांच्याहस्ते आय.एम.ए.पंढरपूरचे अध्यक्ष डॉ. पंकज गायकवाड, डॉ. अरूण मेणकुदळे, सचिव मंदार सोनवणे , डॉ. संभाजी पाचकवडे, डॉ. लाड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. पंकज गायकवाड म्हणाले की, पत्रकारांना 24 तास ड्युटी असल्याने त्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. वाढती स्पर्धा आणि धावपळ यामुळे सततचा ताण घेऊन त्यांना जगावे लागते. त्यामुळे आय.एम.ए.च्यावतीने पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यातून त्यांना आपल्या आरोग्याची पुर्वकल्पना मिळेल तसेच संभाव्य आजाराची माहिती मिळाल्यामुळे काळजी घेता येईल.
यावेळी जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे यांनी, डॉक्टर होण्यासाठी मोठा खडतर अभ्यास करावा लागतो. प्रचंड अर्थिक खर्च आणि त्रास सहन करून रूग्णांची सेवा करावी लागते. त्यामुळे पत्रकार आणि डॉक्टर्स हे दोघेही मानसिक ताण, तणवातून जात असतात असे सांगून सर्व पत्रकारांच्यावतीने डॉक्टर्स मंडळी आणि आय.एम.ए.चे आभार व्यक्त केले.
या शिबीरासाठी डॉ. संभाजी पाचकवडे, डॉ. मेणकुदळे, डॉ. कुंभार, डॉ. संदीप गवळी, डॉ. सुरज पाचकवडे, डॉ. करण वोहरा, डॉ. विशाल फडे, डॉ. लाड, डॉ. विवेक गुंडेवार, डॉ. देशपांडे, डॉ. रोकडे यांनी परिश्रम घेतले. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मोहन डावरे यांनी यावेळी सर्व डॉक्टर्सचे आभार मानले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com


