पंढरपूर LIVE 9 जानेवारी 2018
परळी(प्रतिनिधी)महाशिवरात्री यात्रे दरम्यान न.प.ने बंद पाडलेल्या कुस्ती स्पर्धा या वर्षी घेण्यात याव्या अशा मागणीचे निवेदन ना.धनंजय मुंडे यांना कुस्तीगीर परिषदेचे परळी तालुकाध्यक्ष पै.मुरलीधर मुंडे यांनी शिष्टमंडळासोबत दिले असुन आपल्या मागणीचा मी स्वता जातीने पाठपुरावा करून या वर्षी यात्रेत न.प.च्या वतीने कुस्तीस्पर्धा घेवु असे आश्वासन ना.धनंजय मुंडे यांनी पैलवानांच्या शिष्टमंडळाला दिले.
परळी शहरात प्रभु महादेवाच्या बारा जोर्तिलिंगापैकी पाचवे जोर्तिलिंग असुन दर वर्षी येथे महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते.या यात्रेत अनेक सामाजिक उपक्रम देवल कमेटी, शहरातील व्यापारी,स्वंय सेवी संस्था व न.प.तर्फे राबविले जातात तर तालुक्यातील व जिल्ह्याभरातील पैलवानासाठी कुस्ती स्पर्धाचे आयोजन अनेक वर्षापासुन न.प.करते मात्र गेल्या दोन वर्षापासुन या कुस्तीस्पर्धा न.प.ने बंद केल्यामुळे तालुक्यातील पैलवान नाराज असुन बंद करण्यात आलेल्या कुस्तीस्पर्धा यावर्षीच्या महाशिवरात्री यात्रेत घेण्यात याव्यात अश्या मागणीचे निवेदन पैलवानांच्या शिष्टमंडळानी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांना परळी येथे दिले असुन या वर्षी न.प.च्या वतीने यात्रेत कुस्तीस्पर्धा घेण्यासाठी आपण जातीने पाठपुरावा करू असे आश्वासन दिले हे निवेदन देतांना कुस्तीगीर परिषदेचे परळी तालुकाध्यक्ष पै.मुरलीधर मुंडे,पै.राजेभाऊ मुंडे,माऊली मुंडे,मोहन मुंडे,मुक्ताराम कराड, बबन मुंडे,के.टी.मुंडे, मेघराज मुंडे व अतुल लटपटे उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com


